RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

भाजपा सातारा जिल्हा नेते पुरूषोत्तम जाधव यांना डॉक्टरेट पदवी

11 September 2018 at 20:00

कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीतर्फे सामाजिक कार्याबद्दल गौरव

सातारा : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्यावतीने पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष , भाजपा सातारा जिल्हा नेते श्री. पुरूषोत्तम जाधव यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. पुरूषोत्तम जाधव यांनी जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या  सामाजिक,राजकीय, कृषी,क्रिडा, आरोग्य, शिक्षण, समाजप्रबोधन आदी क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल ही पदवी प्रदान केली आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. आफताब अन्वर शेख व कॉन्सुलेट जनरल डॉ.एच.ई. हेक्टर कुविया जॉकोब, इंदिरा गांधी  टेक्नॉलॉजी व मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ.प्रियरंजन त्रिवेदी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. 

गोवा येथील हॉटेल ताजमध्ये कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात याचे वितरण झाले. यावेळी श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनिमिक्सचे डॉ. मनोज कामत, दि एस. एस. ए. गर्व्हमेंट कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्सचे डॉ. फिलीप मॅलो, डॉ. रॉडनी डिसीलव्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शुन्यातून विश्‍व निर्माण होतं, असं म्हटलं जात पण ते कसं होत हे पुरूषोत्तम जाधव यांनी स्वकर्तृत्वातून दाखवून दिल आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या या विश्‍वात जनसामान्यांना सामावूनही घेतलंय हे विशेष, खंडाळा ही पुरूषोत्तम जाधव यांची जन्मभूमी. आपल्या जन्मभूमीच ऋण फेडण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र पुरूषोत्तम जाधव यांनी जन्मभूमीचे ऋण फेडण्याबरोबरच सातारा जिल्ह्याचा प्रत्येक भाग आपली कर्मभूमी बनवला. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये त्यांचा जनसंपर्क आहे. त्याचबरोबर बहुतांश ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामेही उभी राहिली आहेत. एका मंदिराच्या जिर्णोध्दारापासून पुरूषोत्तम जाधव यांच्या सामाजिक कार्यास प्रारंभ झाला. त्यानंतर अविरतपणे त्यांचे हे कार्य सुरूच आहे. 2007-08 साली खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे ‘पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठान’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबरोबरच शेतकरी, खेळाडूांबरोबरच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासही प्राधान्य दिले जाते. पुरूषोत्तम जाधव हे पोलीस दलात कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक या विभागामध्ये भ्रष्टाचारी अधिकार्यांना स्वतः फिर्यादी बनून लाच घेताना पकडून अनेक कारवाई केल्या. प्रामाणिकपणे सचोटीने 20 वर्षे सेवा करून पोलीस दलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. पुरूषोत्तम जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांची कन्या पूजा हिच्या विवाहप्रसंगी खर्चात बचत करून ‘स्वच्छता तिचा अधिकार’या उपक्रमासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये बांधली जातात. त्यासाठी पुरूषोत्तम जाधव यांनी रोटरी कल्ब ऑफ पुणे रॉयल ट्रस्ट या संस्थेला हा धनादेश प्रदान केला. उन, वारा, पावसाची पर्वा न करता माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होणार्या वारकर्यांसाठी पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने मोफत वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिका सेवा प्रत्येकवर्षी देण्यात येते. पुरूषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत सैनिक व पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण, योग विद्या प्रशिक्षण, गुणवंतांचा सत्कार, गुरूजनांचा सत्कार, आर्थिक दुर्बल, रुग्णांना मोफत उपचार, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा, लघु उद्योजकांचे संघटन, बेरोजगारांसाठी शिबिर, व्यवसायासाठी मार्गदर्शन, महिलांचे संघटन, महिला बचत गट निर्मितीसाठी सहाय्य, पालखी सोहळ्यातील वारक-यांना तंबूचे वाटप, अन्नदान, विविध गणेशोत्सव मंडळे, दहीहंडी मंडळे, नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन,  शहीद जवानांच्या स्मृती सदैव जाग्या रहाव्यात यासाठी शहिद कमानी उभारल्या, व्यायाम शाळा, वाचनालय उभारणीसाठी, अपघात व आपत्तीग्रस्तांना मदत, अपंगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, कुस्ती व इतर खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा भरवुन खेळाला चालना देण्याचा प्रयत्न आदी सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.

पुरूषोत्तम जाधव यांच्या या समजोपयोगी भरीव कार्याबद्दल कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्यावतीने डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अभिनंदन साहेब 💐💐


Sudhakar saundane

खूप खूप धन्यवाद जाधवजी नासिक हूनएटीएमची माहिती घेवून डॉक्टरची फसवणूक

सातार्‍यातील डॉ. विवेक रामचंद्र भोसले (वय 45, रा.मतकर कॉलनी, शाहूपुरी) यांना अज्ञाताने फोन करुन एटीएम ब्लॉक झाल्याचे खोटे सांगून माहिती घेवून फसवणूक केली.

14 hours before

सातार्‍यात गळफास घेवून एकाची आत्महत्या

येथील जुना आरटीओ चौकात असणार्‍या भाड्याच्या खोलीत गळफास घेवून सोमवारी दुपारी युवराज कैलास चव्हाण (वय 33, मुळ रा. कोर्टी, ता. करमाळा, सोलापूर) यांनी आत्महत्या केली.

14 hours before

सेव्हन स्टार परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सेव्हन स्टार बिल्डींग परिसरात जुगार खेळणार्‍या तिघांवर कारवाई करुन पोलिसांनी 5 हजार 655 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.

14 hours before

आगरकर पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

टेंभू (ता.कराड) येथे कै.गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची शुक्रवारी दि. 18 रोजी मध्रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. या समाजकंटकांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार

14 hours before