म्हसवड : कुकुडवाड, ता. माण येथील पाणी फाऊंडेशनच्या कामावर काळवाटाच्या शिवारात मशिनरीचे काम सुरू असून सोमवारी सकाळी पोकलॅन मशिन चालवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ऑपरेटर सोनूकुमार राम (वय 23, मूळ रा. झारखंड) याचा खून झाला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी संतोष (पूर्ण नाव माहीत नाही) पसार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून म्हसवड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, कुकुडवाड येथील राजेंद्र काटकर यांच्या काळवाट नावाच्या शिवारात पाणी फाऊंडेशनचे काम सुरू आहे. या कामावर धनेश सदाशिव घनवट (रा. आगोती, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या पोकलॅनवर संतोष (पूर्ण नाव माहीत नाही, रा. आळंद, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) व सोनूकुमार राम (वय 23) हे दोघेही ऑपरेटर म्हणून काम करत होते. गत 44 दिवस पोकलॅन चालवण्याचे काम दोघांनी केले.
पाणी फाऊंडेशनचे काम दोन दिवस बाकी असताना या ठिकाणी सोनूकुमार व संशयित आरोपी संतोष यांच्यात पोकलॅन मशिन कोणी चालवायचे यातून रविवारी रात्री वाद झाला. याच वादाच्या रागातून संतोष याने सोमवारी सकाळी धारदार शस्त्राने सोनूकुमार राम याच्या पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सोनूकुमार राम याच्या पोटातून आताडी बाहेर आल्याने जाग्यावरच मृत्यू झाला. दरम्यान, दोघेही पाणी फौंडेशनच्या कामासाठी पोकलॅन चालवण्याचे काम करत होते.
या घटनेनंतर आरोपी संतोष फरार झाला आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांनी घटनास्थळी भेट दिली सपोनि मालोजीराव देशमुख यांनी तपास सुरू केला असून कुकूडवाडच्या निनूबाई डोंगरवर आरोपी संतोषची पिशवी सापडली असून त्यामध्ये त्याची कपडे सापडली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा सपोनि देशमुख पोलिस हवलदार खाडे सानप कुकुडवाडचे पोलिस पाटील वैशाली काटकर यांनी केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |