08:09pm | Apr 25, 2020 |
सातारा : जीवघेण्या कोरोनाने कराडकरांची झोप उडवली असताना व 'घरी रहा, सुरक्षित रहा' असे प्रशासन व पोलिसांतर्फे पोटतिडकीने सांगितले जात असताना कराडमधील काही संस्थांनी मात्र लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना वेठीला धरले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजण्याची परिस्थिती निर्माण झाली असून संबंधित कर्मचारी कोरोनाच्या भीतीने तणावाखाली आहेत. स्वत: सुरक्षित राहून कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून मृत्युचे तांडव सुरू आहे. आपल्याकडे प्रशासनाने प्रथमपासून दक्षता घेतल्यामुळे जगाच्या तुलनेत कोरोना अद्याप तरी आटोक्यात आहे. परंतु मानवी चुकांमुळे, बेजबाबदारपणामुळे काही ठिकाणी कोरोनाचे संकट गडद होत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात जास्त फैलाव कराड तालुक्यात झालेला दिसत आहे. तालुक्यातील कोरोना रूग्ण वाढत चालल्यामुळे तालुक्यात कोरोनाची दहशत पसरली आहे.
तालुक्यातील लोक या दहशतीखाली दिवस कंठत आहेत. कराड शहर व परिसरातील बँका, पतसंस्था सध्या बंदच आहेत. तरीदेखील अशा बँका - पतसंस्थांमधील कर्मचाऱ्यांना प्रलंबित कामांचे निमित्त साधून कामावर येण्याची सक्ती केली जात आहे. तर काही विद्यालयांमधील शिक्षकांनाही पेपर घेऊन जाण्यासाठी या असे सांगितले जात असून ते प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांना थांबवून घेऊन त्यांच्याकडून एकत्रितरीत्या पेपर तपासण्याचे काम करून घेतले जात आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून कराड शहर व परिसर वगळता अन्यत्र आर्थिक व्यवहारासाठी बँका, पतसंस्थांना नियम, अटी घालून कामकाज चालवण्यास परवानगी आहे. हे कामकाज करताना कामाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी संबंधित बँक, पतसंस्थेत कमीत कमी मनुष्यबळातून सेवा द्यायची आहे. त्यासाठी त्यांनी नियोजन करायचे आहे. परंतु काही संस्थाचालकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही शैक्षणिक संस्थांच्या बाबतीतही असेच बेदरकार वर्तन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पेपर तपासणे तसेच इतर अपूर्ण कामे पूर्ण करण्याची कारणे काढून लोकांना बोलावून घेतले जात आहे. त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहेत. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवला जात आहे.
अशा अत्यंत जोखमीच्या परिस्थितीतही संस्थेच्या कामाच्या अट्टाहासातून कर्मचाऱ्याच्या जिवाशी खेळले जात आहे. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांना कामाच्या ठिकाणी थांबवून ठेवले जात आहे. सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये काहीतरी निमित्त काढून स्वत: सुरक्षित राहून संस्थाचालक कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहेत. 'मुलांचा होतो खेळ आणि बेडकाचा जातो जीव' याप्रमाणे संबंधित धेंडांचे वर्तन आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. पण या धेंडांच्या अट्टाहासामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. दररोज पोलिसांचाही सामना करावा लागत आहे. अशा वेळी चोर सोडून संन्याशाला फाशी असे होऊ नये अशी अपेक्षा आहे. त्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेने भरारी पथके स्थापन करावीत, स्वत: सुरक्षित राहून कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्ती प्रशासनाने शोधून काढाव्यात व त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |
रस्ता अडविल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा |
महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |