02:33am | Oct 11, 2019 |
कराड : राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर दारू विक्री व वाहतुकीवर छापा टाकून एकास ताब्यात घेत त्याच्याकडील चारचाकी वाहनासह 86 लिटर देशी दारू असा सुमारे 8 लाख 34 हजार 960 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने आज (गुरूवारी) केली.
याबाबत माहिती अशी, विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता कालावधीत व महात्मा गांधीजींच्या जयंती सप्ताहाच्या अनुषंगाने बेकायदेशीर दारू, चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच मतदारांना प्रलोभनासाठी दारूचा वापर होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा अधीक्षक अनिल चासकर यांच्या सुचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने आज (गुरूवारी) कराड विभागाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर दारू विक्री व वाहतुकीवर छापा टाकून एकास मुंबई दारू बंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार चाकी वाहनासह 86 लिटर देशी दारू असा सुमारे 8 लाख 34 हजार 960 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एस.पाटील, दुय्यम निरीक्षक एस.बी.जंगम, पी.ए.बोडेकर, आर.एस.माने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.टी.बावकर, जवान पी.आर.गायकवाड, व्ही.व्ही.बनसोडे, एस.आर.बक्केवाड, जे.एस.माने यांनी केली. यापुढेही आचारसंहिता कालावधीमध्ये बेकायदेशीर दारू विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक आर.एस.पाटील यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |