सातारा : विडणी, ता. फलटण येथील जिमला निघालेल्या तीन युवकांना दि. 15 सप्टेंबर रोजी फलटण-पंढरपूर रस्त्यावरील अष्टविनायक रोपवाटिकेसमोर समोरासमोर धडक देवून पसार झालेल्या ट्रक चालकाला फलटण ग्रामीण पोलिसांनी कळंबोली, नवी मुंबई येथून काल रात्री ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 15 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान विडणी, ता. फलटण येथील अमित बबन नाळे (वय 22), अक्षय रामचंद्र नाळे (वय 23) व राहुल रविंद्र नाळे (वय 23) हे सख्खे चुलतभाऊ पोलीस भरती होण्यासाठी नियमित व्यायाम करीत होते. दरम्यान पिंपरद, ता. फलटण येथील एका जिममध्ये व्यायाम करण्यासाठी ते निघाले असता विडणी गावच्या हद्दीत फलटण-पंढरपूर रस्त्यावरील अष्टविनायक रोपवाटिकेसमोर अज्ञात ट्रकने ट्रिपल सीट असलेल्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. ही धडक एवढी भीषण होती की या तिघांचाही त्यात जागीच मृत्यू झाला होता. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर विडणी गावावर शोककळा पसरली होती. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीसांनी अज्ञात ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले होते. अपघातस्थळापासून राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंतचे सर्वच सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरजे 18 - जीबी - 1293 हा ट्रक डिटेक्ट करण्यात आला होता. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुलकुमार भोळ यांना हा ट्रक कळंबोली, नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काल फलटण पोलीस ठाण्याचे तपास पथक कळंबोली येथे पोहोचले. कळंबोलीतील ट्रक टर्मिनल असलेल्या ठिकाणी जावून साऊथ मुंबई कंटेनर सर्व्हिसेसच्या कार्यालयात संबंधित ट्रक चालक असगर अस्लम खान हा सापडला. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेत आज सकाळी ट्रकसह चालकाला फलटण येथे आणण्यात आले. ट्रक चालकावर 304/2 तसेच मोटर व्हेईकल ऍक्टनुसार गुन्हा नोंद केला असून त्याला आज फलटण न्यायालयासमोर उभे केले जाणार असल्याची माहिती फलटण पोलिसांकडून देण्यात आली आहे.
विडणी येथील एकाच घरातील चुलत भावंडांच्या अपघाती निधनानंतर फलटण तालुक्यातील वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे कठीण आव्हान फलटण ग्रामीण पोलिसांसमोर निर्माण झाले असतानाही फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुलकुमार भोळ, पोलीस नाईक भोसले, देवा तुपे, सचिन पाटोळे, अवघडे, जगदाळे यांनी हा किचकट तपास लावल्यामुळे फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. फलटणचे पोलीस उप अधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक हंकारे यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे. या पथकाला रिवॉर्ड मिळावे, असा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हंकारे यांनी दिली आहे.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |