सातारा: शहरातील विविध तीन मोबाईल दुकानांमधील 20 लोकांना बँकेने जप्त केलेल्या वस्तू स्वस्तात मिळवून देणे, कर्ज करून देणे यासाठी रक्कम उकळून सुमारे 19 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आकाश अशोक शिंदे, रा. शिंदेमळा, ता. कोरेगाव हे व्हिवोचे ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डिसेंबर 2017 पासून आशिष चंद्रकांत खरात, अंकुश दिलीप कारंडे, पुजा आशिष खरात आणि दिलीप कारंडे सर्व रा. नागठाणे, ता. सातारा यांनी सातार्यातील एस. एस. कम्युनिकेशन, अंबिका मोबाईल शॉपी आणि राजधानी मोबाईल शॉपी येथे काम करणार्या नागरिकांना बँकेकडून जप्त केलेल्या वस्तू स्वस्तात मिळवून देणे, वैयक्तिक व ग्रुप कर्ज करून देणे, मोबाईलसाठी ग्राहक देणे अशी प्रलोभने देऊन 20 नागरिकांकडून पैसे उकळले. सासपडे, नागठाणे, निगडी, अतित, कोडोली आणि शहर व परिसरातील हे नागरिक आहेत.
पैसे घेतल्यानंतर या चौघांनीही त्या 20 नागरिकांचे कोणतेही काम केले नाही. ही बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यामुळे चौघांवर 18 लाख 93 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |