03:34am | Feb 15, 2020 |
सातारा : जिल्हा पोलीस निर्भया पथक यांच्या वतीने शनिवार दि. १५ रोजी रात्री ११ वा. महिलांसाठी वाॅकथॉन (चालणे) ३ कि.मी.(Walkathon) उपक्रम घेण्यात येणार आहे.
देशामध्ये महिलांवरच्या अत्याचाराबाबतच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. दरम्यान अनेक महिला अजूनही धाडसाने पुढे येऊन सक्षमपणे संकटाचा सामना करताना दिसत नाहीत. प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिलां पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मात्र एखादं मोठं संकट ज्यावेळेस महिलांवर कोसळतं, त्यावेळेस त्या मात्र कोणाचा तरी आधार शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस योग्य आधार व मदत न मिळाल्याने त्यांना संकटाला सामोरे जावे लागते. महिलांवर अन्याय व अत्याचाराच्या अनेक घटना या देशांमध्ये घडताना आजही दिसत आहेत.
म्हणूनच आजची नारी सक्षम झाली पाहिजे.स्वतःवर आलेल्या संकटाचा सामना तिने निर्भयपणे स्वतः केला पाहिजे. याच उद्देशाने सातारा पोलिसांनी walkathon हा एक अभिनव उपक्रम हातात घेतलेला आहे.
महिलांचा हा वॉक 3 किलोमीटरचा असून,तो १५ तारखेला रात्री ११ वाजता सुरू होणार आहे. रात्रीचा हा उपक्रम घेण्या पाठीमागचा उद्देश असा आहे की, चूल आणि मुल ह्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन महिलांनी निर्भयपणे रात्रीचे बाहेर पडलं पाहिजे आणि संकटाचा सामना केला पाहिजे.
सदरचा वॉक महिलांसाठी असून तो गांधी मैदान येथून सुरू होऊन खालच्या रोडने पोलीस मुख्यालय, लाॅकप टर्न पोलीस लाईन नगरपालीका, कमानी हौद, मोती चौक राजवाडा अशी असणार आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक सहभागी स्पर्धकाला एक निर्भय प्रशासकीय पत्र देण्यात येणार आहे. या वॉकसाठी जास्तीत जास्त महिला व मुलींचा सहभाग झाला पाहिजे व सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय, निवासी शाळा या सर्वांनी वॉक उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, एएसपी समीर शेख यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |