07:31pm | Mar 24, 2020 |
मुंबई : देशात वाढता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास अन्न आणि औषध प्रसाधन मंत्रालय प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. मात्र देशाची लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बांधितांची संख्या विचारात घेता भारतातील दारु उत्पादकांना सॅनिटायझर बनवणेचे आदेश द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी अन्न व औषध प्रसाधन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
कोविड - १९ चे देशात वाढते रुग्ण याची गांभिर्याने दखल घेऊन डॉ.गवई यांनी मुंबईस्थित अन्न औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे. जिवघेण्या विषाणुचा व्हायरस मारण्या करीता हॅन्ड सॅनिटासर मध्ये अल्कोहलचे एक ठराविक प्रमाण असणे आवश्यक असते. WHO (World Health Organisation) ने या बाबत काही मार्गदर्शक तत्व ठरविली आहेत. त्याचे पालन होते की नाही या बाबत अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सुचना करत असताना, युरोप व कॅनडात दारू उत्पादकांनी काही प्रमाणात दारुचे उत्पादन कमी करुन काही बॅचेश हॅन्ड सॅनिटायझरचे बनवले आहेत. यु.के.ची कंपनी ब्रिव डॉग (Brew Dog) यांनी आपले बिअरचे उत्पादन पुर्णपणे बंद केले आहे. भारतात अद्यापही कोणता दारु उत्पादक पुढे आला नाही हे निदर्शनास आणून देत हॅन्ड सॅनिटायझर आणि हर्बल सॅनिटायझर बद्दलची माहिती मंत्री महोदयांना दिली.
अशा प्रतिकुल परिस्थितीत हॅन्ड सैनिटायझरचा तुटवडा असताना गरिबांना परवडेल अशा २ रु. साबणाची निर्मिती वाढवावी. हात २० सेंकद कसे धुवावे याची माहिती देण्यासाठी सरकारने चित्रफीत बनवावी आणि त्यांचा प्रसार करावा, अशी विनंतीही डॉ गवईंनी भेटीवेळी केली आहे.
मंत्री महोदयांच्या भेटी प्रसंगी केवळ मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद खरात यांना सोबत घेऊन डॉ. राजेंद्र गवई यांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन केले.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |