12:50am | Feb 22, 2020 |
कराड : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा युवा गौरव पुरस्कार ओंड, ता.कराड येथील सौ.मधुराणी आनंदा थोरात यांना प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्यावतीने आयोजित जिल्हा युवा संमेलनात युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाबळेश्वर येथील सनराईज कॅन्डल्सचे सीईओ भावेश भाटीया, जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे, समाजकार्य पदवीका महाविद्यालयाच्या प्राचार्या शाली जोसेफ, पेस ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे संचालक युवराज भंडलकर, नेहरु युवा केंद्र, सातारा जिल्हा समन्वयक कालिदास घाटवळ, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र यादव, तिर्री गोपी, लेखाधिकारी भानुदास यादव यांची उपस्थिती होती.
सौ.मधुराणी आनंदा थोरात या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 2009 सालापासून आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, पर्यावरण व महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास क्षेत्रात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहेत. कराडमधील ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शहरासह चौदाव्या वित्त आयोगातर्गंत गावापासून वाडीवस्तींपर्यंत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देवून अनेकांना विशेषत: महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी कायदे व हक्कविषयीक आणि विशेषत: डिजिटल साक्षरता प्रशिक्षण व कार्यशाळा घेतली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्गंत राष्ट्रीय जनसहयोग एवं बालविकास संस्थानच्या (निपसीड) असुरक्षित महिलांसाठी समुपदेशन विषयी कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाद्वारे असुरक्षीत महिलांसाठी समुपदेशन करण्याचे काम करत आहेत. शासनाच्या यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून ग्रामविकास विकास आराखडा निर्मितीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावस्तरावरील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांत सहभागी होण्याबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणूनही योगदान दिले आहे. नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. सनबीम व ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी डिजीटल साक्षरता कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती योजना अभियान (कराड तालुका पंचायत समिती) येथे समुह साधन व्यक्ती (बीआरपी) म्हणून कार्य करताना महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले आहे. कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्या म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक अंकेक्षण अंतर्गंत रोजगार हमी योजनेचे कराड तालुकास्तरावर सीआरपी म्हणून कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या कामांची तपासणी करुन रोहयोचे महत्व आणि जॉबकार्डधारकांचे हक्कांविषयी जागृती केली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे. डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुलींचे वसतीगृहात नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्या योगदान देत आहेत. कोरो, मुंबई यांच्या माध्यमातून एकल महिलांचे संघटन उभारण्यासाठी त्यांनी कापील, गोळेश्वरसह कराड तालुक्यात चळवळ उभारण्यास प्रारंभ केला आहे. एकल महिलांचे एकसंघ करुन त्यांचा बचत गट उभारणीसह त्यांच्या आरोग्य, शिक्षण व उपजिविका याकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकत्यांकरिता नेतृत्वविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहेत. महिला व बालविकास विभागाच्यावतीने कराड येथील आशाकिरण महिलांचे शासकीय वसतीगृहात समुपदेशन करण्यासाठी त्यांना नियुक्त केले आहे. नेेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.मधुराणी थोरात यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |