11:47pm | Jun 01, 2018 |
सातारा : बुधवार नाक्यावरील फायरिंगप्रकरणी ऋषभ राजेंद्र जाधव (रा.रविवार पेठ) याच्याविरुध्द प्राणघातक हल्ला व आर्म अॅक्टप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अतिक हसन शेख (वय 22, रा.बुधवा पेठ) याने तक्रार दिली आहे. प्रेमप्रकरणाच्या कारणातूनच ऋषभ याने आपल्यावर गोळीबार केला असल्याचा जबाब त्याने दिल्याने घटनेचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संशयित ऋषभ अद्याप पसारच असून पोलिसांना त्याचा सुगावा लागलेला नाही.
गुरुवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्यग सुमारास संशयित ऋषभ जाधव याने भरवर्दळीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार करुन अक्षरश: सातारा हादरवून सोडला. ऋषभ व अतिक या दोघांमध्ये एका युवतीवरुन वाद आहे. या वादातून दोघांमध्ये दोनवेळेला खटकाखटकीही झालेली आहे. हा वाद तेवढ्यावरच न थांबता अखेर गुरुवारी पुन्हा फायरिंगमध्ये झाला. दुर्देवाने मात्र या दोघांच्या वादामध्ये सामान्य सातारकर वेठीस धरला गेला. संशयिताने थेट पिस्तूल काढून अतिकवर निशाना धरला. मात्र अतिक तो चुकवला व ती गोळी किरणा दुकानात साहित्य आणण्यासाठी गेलेली युवतीला लागली. यावेळी त्या युवतीकडे दोन वर्षाचा मुलगाही होता. गंभीर जखमी झालेल्या युवतीवर खासगी रुग्णालयात अद्याप उपचार सुरु आहेत.
फायरिंगच्या या घटनेनंतर खा.उदयनराजे भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जखमी व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी जमाव कमालीचा संतप्त होता. संशयिताला अटक करुन त्यालाच गोळ्या घाला अशीही मागणी करण्यात आली.या सर्व घटनेनंतर परिसर अद्याप तणावाखाली आहे. फायरिंगच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. संशयित हा दुचाकीवर इतर दोन युवकांसोबत आला होता. यामुळे संशयित ऋषभ याच्याकडून पिस्टल कोठून आले? त्याचे अन्य दोन साथीदार कोण? संशयिताकडील दुचाकी कोणाची? यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे? अशा विविध प्रश्नांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशीरा याप्रकरणी अतिक शेख याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन प्रेमसंबंधांच्या कारणातून फायरिंग केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे या दोघांमध्ये कमालीचा संघर्ष निर्माण झाला. अतिक याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ऋषभ जाधव याच्याविरुध्द प्राणघातक हल्ला व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली. मात्र रात्रभर व शुक्रवारी दिवसभरातही संशयित पोलिसांना सापडलेले नाहीत. पोनि किशोर धुमाळ पुढील तपास करत आहेत.
बुधवार नाका येथे संशयित ऋषभ याने फायर केलेली पिस्टलमधील गोळी चुकून अश्विनी कांबळे या युवतीला लागल्यानंतर ती गंभीर जखमी झाली. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर अश्विनीच्या पोटालगत गोळी लागून ती तेथेच राहिल्याचे समोर आले. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन अखेर ती गोळी बाहेर काढली आहे. या प्रक्रियेत अश्विीनीची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, डॉक्टरांनी काढलेली गोळी शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यामुळे घटनास्थळी सापडलेली पुंगळी व पोटातून काढलेली गोळी या व्यतिरीक्त अद्याप पोलिसांना काहीही सापडलेले नसून पोलिस तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |