कराड : धावरवाडी (ता.कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या ८ व्या गळीत हंगामाला गुरूवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यंदाच्या गळीत हंगामात ‘जयवंत शुगर्स’ ७ लाख टन ऊसगाळप करेल, असा विश्वास ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.
डॉ.सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, कराडच्या नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, पैलवान शिवाजीराव जाधव, जितेंद्र पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, गिरीष पाटील, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, जयवंत शुगर्सच्या उभारणीमध्ये धावरवाडी, चोरे, मरळी यासह आसपासच्या सर्वच गावांतील लोकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी हित जोपासत केलेल्या अचूक नियोजनामुळे गेल्या ८ वर्षात शेतकरी सभासदांमध्ये जयवंत शुगर्सची विश्वासार्हता वाढली आहे. १३.०४ ही सर्वोच्च रिकव्हरीदेखाली जयवंत शुगर्सनेच प्राप्त केली आहे. त्यामुळे आजही अनेक शेतकरी आपला ऊस जयवंत शुगर्सलाच घालविण्यासाठी आग्रही असतात.
साखरेच्या दराबाबत भाष्य करताना ते म्हणाले, शेतकर्यांना अधिक दर मिळावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. गेल्यावर्षी जो दर निश्चित करण्यात आला होता, त्यातील फरक रक्कम येत्या काळात निश्चित दिली जाणार असल्याने, शेतकर्यांनी निश्चिंत राहावे. साखरेचा विक्री दर जास्त राहिला तर साखर कारखानदारांनाही जास्त दर देणे शक्य होते. यासाठीच साखरेचा विक्री दर ३१०० ते ३२०० रूपयांपर्यंत करावा, अशी मागणी सरकारकडे केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत अनुकुलता दर्शविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योगाबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सकारात्मक धोरणांचा आढावा घेताना नामदार डॉ.अतुल भोसले म्हणाले, साखर उद्योगाकडे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे विशेष लक्ष आहे. बफर स्टॉक, इथेनॉलसाठी कमी व्याजदराने कर्ज, इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय असे अनेक सकारात्मक निर्णय सरकारने घेतले आहेत. इथेनॉल निर्मितीला मोदी सरकारने प्राधान्य दिले असून, त्यासाठी ६००० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जयवंत शुगर्समुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली असून, भाजपा सरकारच्या माध्यमातून रस्त्याची अनेक कामेही मार्गी लागली आहेत.
जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी.एन.देशपांडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. पोपटराव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. चोरे गावचे माजी सरपंच दत्तात्रय साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, तातोबा थोरात, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप थोरात, संग्राम पाटील, मुकुंद चरेगावकर, पैलवान आनंदराव मोहिते, पैलवान धनाजी पाटील, गजेंद्र पाटील, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक जाधव, दाजी जमाले, प्रताप पाटील, इंदोलीचे सरपंच संदीप निकम, मोहनराव मोहिते यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |