02:11am | Nov 18, 2018 |
उंब्रज : खंडोबा देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो भाविक येत असतात. त्यांच्या सोयीसुविधासाठी सर्वांनी संघटीत होऊन काम करावे. हा सोहळा गावाचा नसून तो राज्याचा सोहळा आहे. यासाठी सर्व विभाग, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी एकत्रीत विभागाच्या अधिकार्यांनी ज्या सूचना मांडल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा एस.ओ.पी.प्रमाणे आराखडा तयार करण्यात यावा. पुढील आढावा बैठकीपर्यंत सर्व विभागांनी आपआपली कामे पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी केल्या.
पाल (ता.कराड) येथील खंडोबा म्हाळसाकांत यात्रा दि. 18 जानेवारी 2019 रोजी संपन्न होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित पहिल्या शासकीय नियोजन आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार अजित कुर्हाडे, देवस्थान ट्रस्टचे प्रमुख मानकरी व माजी सभापती देवराज पाटील,पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, सर्व विभागाचे अधिकारी, सरपंच जगन्नाथ पालकर, उपसरपंच लवदे, संजय काळभोर, रघुनाथ खंडाईत यांच्यासह मानकरी व नागरीक उपस्थित होते.
प्रांताधिकारी हिम्मत खराडे म्हणाले, महावितरण व बांधकाम विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यासाठी संबधित अधिकार्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांची चांगल्या पद्धतीने दुरूस्ती करून आपत्कालीन असणार्या रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे. आवश्यक त्या उपाययोजना करून 5 डिंसेबरपर्यत जिल्हाधिकारी यांना यात्रेचा आराखडा सादर करण्यात यावा, यात्रा अनुषंगाने सर्व विभागांनी कामाला लागावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
नवनाथ ढवळे म्हणाले, देवाचे मानकरी यांना होणार्या गर्दीवेळी अडचणीला सामोरे जावे लागते. यासाठी स्थानिक पोलीस कर्मचार्यांची मंदीर परिसरात नेेमणूक करण्यात येईल.
राज्य परिवहन विभागाने यंदा यात्रा कालावधीत दरवर्षीप्रमाणेच गाडयांचे वेळापत्रक राहील, असे सांगताच ग्रामस्थांनी सातारा-पाली एसटी बस सुरू करण्याची मागणी केली. अन्न व औषध विभागाकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची तीन तपास पथके असणार आहेत. आरोग्य विभागाकडून आपत्कालीन व्यवस्थेसाठी दहा वैद्यकीय अधिकारी, 54 कर्मचारी तसेच एकूण 8 रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
देवराज पाटील म्हणाले, नदीपात्रात असणार्या रथमार्गावरील पुलाचे काम निधीअभावी अद्यापपर्यंत झालेले नाही. त्यामुळे रथमार्गावर तात्पुरता पूल उभारून ग्रामपंचायत प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपये खर्च करावे लागतात. यासाठी कायमस्वरूपीचा पूल व्हावा, सुसज्ज बसस्थानक व्हावे यासाठी गेल्या 15 वर्षापासून आमची मागणी असतानाही त्याकडे प्रशासन का लक्ष देत नाही? असा सवाल उपस्थित केला. सूत्रसंचालन उद्धव फाळके यांनी केले. आभार संदीप चव्हाण यांनी मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |