सातारा : दारु पिण्यासाठी पैसे दे म्हणून, पत्नीला काठीने बेदम मारुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिपक महादेव माने (वय 40, रा.डबेवाडी ता.सातारा) याला पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधिश वाय.एच.अमेठा यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड तो न दिल्यास 6 महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, याप्रकरणी आरोपीच्या मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
सौ.वंदना दिपक माने (रा.35, रा.डबेवाडी) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तृप्ती दिपक माने (वय 14) या मुलीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 8 फेब्रुवारी 2017 रोजी दिपक माने हा दारु पिवून घरी गेला होता. यावेळी पत्नी वंदना यांना आणखी दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पत्नीने पैसे नसल्याचे सांगताच संतापलेल्या दिपक याने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी बेदम होती की सौ.वंदना यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दि. 8 रोजीच मुलगी तृप्ती हिच्या जबाबावरुन तालुका पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. मात्र बेदम मारहाण झाल्याने उपचारादरम्यान सौ.वंदना माने यांचा दि. 15 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,दिपक माने हा गवंडी काम करायचा. माने दाम्पत्याला एकूण चार मुली आहेत. दिपक माने हा दारुच्या आहारी गेल्याने तो रोज पत्नीला मारहाण व शिवीगाळ करत होता.
मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तालुका पोलिसांनी खूनाचा गुन्ह्याची कलमे वाढवून लावली. या सर्व प्रकरणाचा तपास फौजदार चेतन मछले यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी त्याचवेळी दिपक माने याला अटक केली असून ही केस अंडर ट्रायल सुरु होती. न्यायालयात याप्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकार व बचाव पक्षाच्यावतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी दिपक माने याला पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड.ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार शुभांगी वाघ, शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |