RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मद्यपी युवकांची महिलांसह नागरिकांना मारहाण ; सहा जणांविरुध्द गुन्हा

09 October 2018 at 03:37

सातारा : माची पेठेत हॉटेल चालकाला मारहाण करुन त्याला सोडवण्यासाठी आलेल्या अपार्टमेंटमधील महिलांसह नागरिकांना दारु पिणार्‍या टोळक्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. खुलेआम दारु पित असताना ही घटना घडली असून सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरु होता. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

अभिजीत चंद्रकांत महाडीक (रा.ढोल्या गणपती शेजारी), साईनाथ संभाजी पवार (रा.मंगळवार पेठ), बापू बबन सकटे (रा.जकातवाडी), शांताराम कोढोंबा खरात (रा.माची पेठ), आनंदा संभाजी सकटे (रा.शहापूर) व अक्षय पांडूरंग जगताप (रा.माची पेठ, सर्व सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वैभव जयवंत परदेशी (वय 29, रा.बुधवार पेठ) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार वैभव परदेशी यांचा माची पेठेत हॉटेलचा व्यवसाय आहे. दि. 7 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास यातील एका संशयिताने तक्रारदार यांच्या हॉटेलमधून दारु पिण्यासाठी पाण्याचा जग नेला होता. बराच वेळ झाल्याने व हॉटेल बंद करायचे असल्याने हॉटेलमधील आझर आगा याने संशयित युवकांना पाण्याचा जग मागितला.

पाण्याचा जग मागितल्याच्या कारणातून संशयित चिडले व त्यांनी आझर आगा याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भर वर्दळीच्या परिसरात संशयितांनी दहशत केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आझर बचावासाठी याचना करत असताना परिसरातील नक्षत्र अपार्टमेंटमधील चंद्रकांत पवार हे भांडणे सोडवण्यासाठी गेले. मात्र मद्यधुंद अवस्थेतील संशयितांनी पवार यांना त्यांच्याच घरात घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांनी अपार्टमेंटमध्ये घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करत राडा केल्याने परिसरातील महिला व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. तोयर्पंत पवार यांच्या पत्नीने मारहाण करु नका असे सांगत असताना त्यांनाही मारहाण झाली. यावेळी संशयित युवकांनी अपार्टमेंटमधील युवकांनी पन्हाळे, कायस्त या कुटुंबियांनाही दमदाटी करत शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार घडत असताना त्याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन यातील दोघांना अटक केली. दरम्यान, या सर्व घटनेमुळे परिसरात नागरिक भयभित झाले असून संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

रामदास माने उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित

लोधवडेचे सुपूत्र व पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास मानसिंग माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील समर्थ फांऊंडेशनच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे "उद्योग भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे.

3 hours before

कास्ट्राईब संघटना राज्यभर आंदोलन छेडणार : अजित वाघमारे

विषयावर राज्यभर जनजागृती करुन सरकाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली.

4 hours before

पतंग उडवताना विहिरीत पडल्याने मुलाचा बुडून मृत्यू

येथील राधिका रोडवर प्रतापसिंह शेतीफार्म नजीक असलेल्या विहरीत प्रतीक गुलाब मतकर (वय 16, रा.बुधवार) या युवकाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सालपे येथील वृद्धेच्या खुनाचा अखेर दीड महिन्यानंतर छडा

सालपे ता. फलटण येथे शांताबाई जयवंत खरात (वय 70) या वृध्द महिलेच्या खूनाला अखेर दीड महिन्यानंतर वाचा फुटली असून चोरीच्या उद्देशाने तो खून झाला असल्याचे समोर आला आहे.

5 hours before