कराड : स्वच्छतेचा डंका पिटणार्या कराड नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुधवार पेठेतील सोनाक्षी प्रवीण कांबळे (वय 8 वर्ष) हिचा डेंग्यूने मृत्यू झालाअसल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. दरम्यान तिच्याच दोन वर्षीय सख्खा भाऊ रियांश व परीसरातील सुमारे वीस नागरिकांना देखील डेंग्यूचे निदान झाले असल्याने खळबळ उडाली आहे.
कराडच्या बुधवार पेठेत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाशेजारी कांबळे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. सोनाक्षी ही नूतन मराठी शाळेत इयत्ता 3 रीच्या वर्गात शिकत होती. अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभावामुळे ती परिसरात सर्वांची लाडकी होती.
शुक्रवार दि.3 रोजी रात्री 10 च्या दरम्यान तिला अचानक ताप आला. मोठ्या प्रमाणात ताप असल्याने खाजगी रुग्णालयात तिला दाखल करून तपासण्या करण्यात आल्या.त्यावेळी तिला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले.दरम्यान शनिवारी सकाळी तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटे तिचा उपचार घेत असताना मृत्यू झाला.
दरम्यान तिचा दोन वर्षांचा भाऊ रियांश याला देखील ताप आल्याने त्याचीही तपासणी करण्यात आली.त्या तपासणीत त्यालाही डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले असून त्याच्यावर कराडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवार पेठ परिसरात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.आंबेडकर क्रीडांगणावर गवत व घाणीचे साम्राज्य वाढले असून स्वछता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवल्याचा डंका पिटणारी नगरपालिका या परिसरातील स्वच्छतेच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.सोनाक्षीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नगरपालिकेच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |