02:54pm | Mar 19, 2020 |
कराड : भारतामध्ये सध्या करोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, यावर तात्काळ उपाययोजना व्हावी व याचा फैलाव रोखणेसाठी स्थानिक पातळीवर नागरिकांचे प्रबोधन, जनजागृती व्हावी याकरिता मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने मंगळवार दि.17 मार्च रोजी लक्ष्मीनगर बहुउद्देशिय इमारत या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनिस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, खाजगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका तसेच भारती विद्यापीठ येथील शिक्षकांची संयुक्त बैठक आयोजित करणेत आली होती. सदर बैठकीस नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्षा सौ.निमल येडगे, उपनगराध्य मनोहर शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, मंडल अधिकारी पंडित पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र काले वैद्यकिय अधिकारी आर.बी.यादव, एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षक सौ.कुरतडकर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस मनोहर शिंदे, उपनगराध्यक्षा तथा सभापती, पाणीपुरवठा, स्वच्छता, जननिस्सारण समिती यांनी सध्या करोना व्हायरसबाबत देशपातळीवर व राज्य पातळीवर केले जात असलेल्या उपाय योजनांची माहिती उपस्थितीतांना अवगत केली. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी रविवार, दि. 15 रोजीचे बैठकीमध्ये संपुर्ण शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती संकलन करणेच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषदेने प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करणेचे नियोजन केलेले आहे. नगरपरिषदेकडे आशा सेविका नियुक्त नसलेमुळे अंगणवाडी सेविका/मदतनिस, शालेय व महाविद्यालयीन शिक्षक, नगरपरिषद कर्मचारी यांचे मदतीने सर्व्हेक्षणाचे काम बुधवार, दि. 18 पासून हाती घेणेत येणार आहे. याकरिता नगरपरिषदेने 9 प्रभागामध्ये विभागनिहाय पथक नियुक्त केले असून, एका पथकामध्ये समन्वयक मिळून 5 जणांचा समावेश केलेला आहे. नगरपरिषदेने याकरिता फॉर्म छपाई करुन त्याद्वारे माहिती संकलन करणार आहे. या फॉर्ममध्ये कुटूंबातील व्यक्तींच्या सध्याच्या आरोग्याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, श्वसन क्रियेच्या तक्रारी इत्यादी बाबींचा समावेश आहे.
नगरपरिषदेमार्फत दररोज केल्या जाणार्या सर्व्हेक्षण कामाचा अहवाल त्याच दिवशी जिल्हाधिकारी, सातारा यांना सादर केला जाणार असून, सर्व्हेक्षणामध्ये आढळून येणार्या बाबींवर आरोग्य विभागामार्फत शहनिशा करणेत येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बाधित शहरातून आलेल्या व्यक्तींच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, त्यांच्याकरीता स्वतंत्र व्यवस्था ठेवणेत येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्व्हेक्षणावेळी सत्य परिस्थिती सांगावी. जेणेकरुन नगरपरिषद ज्या-त्या वेळी उपाययोजना करणे शक्य आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हात धुण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या शेजारी इतर बाधित शहरातून आलेल्या व्यक्तींची माहिती तातडीने नगरपरिषदेने स्थापन केलेल्या कक्षाला कळवावी. याकरिता नगरपरिषदेने विभाग निहाय नगरपरिषदेच्या अधिकार्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहेत.
याबरोबरच शहरामधील मेडिकल व्यवसाय, हात गाडीद्वारे खाद्य व्यवसाय करणारे व्यवसायिक, हॉटेल धारक, चिकन-मटण विक्रेते यांचीही स्वतंत्र बैठक आयोजित करणेत आली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी, सातारा यांनी दिलेल्या सुचनांनुसार सार्व. आरोग्यास धोका निर्माण होऊ नये याकरिता गर्दीचे ठिकाणी बंद करणेबाबत विनंती करणेत आली. तसेच हॉटेल व्यवसाय धारकांनी संबंधित हॉटेलमध्ये येणारे ग्राहक यांच्यासाठी सर्व उपाययोजना करणेबाबत सुचना देणेत आल्या. तसेच चिकन व मटण विक्रेते यांनी सुद्धा ग्राहकांच्या सुरक्षितेची काळजी म्हणून पुढील आदेश होईतोपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवणेबाबत सुचित करणेत आले. मेडिकल व्यवसाय धारकांनी आपल्या दुकानामध्ये येणार्या रुग्णांची माहिती संकलन करुन संशयस्पदरित्या काही गोष्टी आढळून आलेस याची तात्काळ कल्पना नगरपरिषदेस देणेची सुचना केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |