11:36pm | Apr 05, 2020 |
सातारा : कर्तव्य बजावताना कठोर होणाऱ्या पोलीस बांधवांच्या ह्रदयातील माणुसकीचा ओलावा उंब्रजकरांनी अनुभवला. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या जनतेला धान्य तसेच भाजीपाल्याचे वाटप करून पोलिसांनी मराठी संस्कृतीचे महात्म्य जगाला दाखवून दिले.
कराड तालुक्यातील उंब्रज येथे लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरिबांची चूल पेटणे अवघड झाले. हाताला काम नाही, खिशात दाम नाही आणि जगण्यात राम नाही अशी या लोकांची अवस्था झाली. अशावेळी नेहमी कायदा व सुव्यवस्थेसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या पोलीस बांधवांवर कधी नव्हे ती वेगळीच जबाबदारी येऊन पडली. लोकांना घरातच थांबवून ठेवून त्यांच्या जीविताचे रक्षण करताना स्वतः पोलीस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले आहेत.
मात्र लॉकडाऊनमुळे लोकांना दैनंदिन जीवनात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उंब्रज परिसरातील गरीबांची अवस्था पाहून उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी मदतीसाठी जनतेला आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत पोलीस स्टेशन हद्दीतील दानशूर व्यक्तीनी धान्य तसेच भाजीपाला उपलब्ध करून दिला.
उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील हातावरील पोट असणाऱ्या ४० गोर-गरीब नागरिकांना व लहान मुले असणाऱ्या महिलांना दानशूर व्यक्तीनी दिलेले हे धान्य वाटप करण्यात आले. तसेच दानशुरांनी दिलेला भाजीपाला २०० कुटुंबाना घरपोच देण्यात आला आहे. या उपक्रमातून पोलिसांमधील 'माणूस' पहायला मिळाला तसेच पोलिसांबद्दलचा आदर कितीतरी पटीने वाढला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |