सातारा : वाळू चोरीप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहेे. एलबीएस कॉलेज परिसरात ही संशयितांनी पिंपोडे ता.कोरेगाव येथून डंपरमधून वाळू आणली असल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
सागर यशवंत भिसे (वय 23, रा.कोंडवे), अविनाश शिवाजी माने (रा.गोळीबार मैदान), समीर, विक्रमसिंह निपाणी, अण्णा शिंदे (पूर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार श्रीमंत यादव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे पोलिसांची गस्त सुरु होती. गस्त सुरु असताना एलबीएस कॉलेज परिसरात काही संशयास्पद वाहन असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यानुसार घटनास्थळी जावून पाहिले असता त्याठिकाणी एक ट्रक दिसला. पोलिसांनी त्यामध्ये पाहणी केली असता वाळू होती. संशयित चालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने अडीच ब्रास वाळू असल्याचे सांगितले. वाळू परवानाबाबत पोलिसांनी विचारले असता तो निरुत्तर झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तो ट्रक जप्त केला.
दरम्यान, यातील सागर भिसे व अविनाश माने या दोघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांनी इतर तिघांची नावे सांगितली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. शनिवारी पहाटे आणखी एक ट्रक वाळू चोरी करत असल्याचे समोर आले असून ट्रक क्रमांकावरुन त्याचा तपास करत आहेत. सहाय्यक फौजदार आर.के.पवार पुढील तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |