01:18am | Mar 24, 2018 |
सातारा : बॅकेतून काढलेली १ लाख ३0 हजारांची रोकड असणारी बॅग कोंडवे (ता.सातारा) येथील माजी सैनिकाची रिक्षात ठेवलेली बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी करंजेनाका येथे शुक्रवारी दुपारी हिसकावून नेली. याची तक्रार नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरु होते.
कोंडवे येथे विलास सोपान गाडे (वय ६५) हे कुटुंबियांसमवेत राहण्यास आहेत. गाडे हे माजी सैनिक असून शुक्रवारी ते साताऱ्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रोकड काढण्यासाठी आले होते. खात्यावरची १ लाख ३0 हजारांची रोकड काढल्यानंतर गाडे यांनी ती बॅगेत ठेवली. ते दोघेही नंतर बसस्थानकाजवळ आले. कोंडवे येथे जाणाऱ्या रिक्षात गाडे हे पत्नीसमवेत बसले. पैसे असणारी बॅग त्यांच्या पत्नीने पाठीमागील सीटच्या मोकळ्या जागेत ठेवली होती. करंजेनाका येथे आल्यानंतर प्रवासी उतरणार असल्याने रिक्षा थांबली. याच दरम्यान दुचाकीवरुन दोन युवक रिक्षाच्या पाठीमागून आले.
रिक्षाच्या पाठीमागे दुचाकी थांबल्यानंतर एक युवक रिक्षाजवळ आला व त्याने आत असणारी रोकडची बॅग ओढून नेली. गाडे यांची तक्रार नोंदवून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |