कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाटा (ता. कराड) येथील चेकपोस्टवर गुरूवारी सकाळी स्कोडा कारमध्ये दीड लाखाची रोकड सापडली. ती रक्कम चेकपोस्टवरील स्थिर पथकाने ताब्यात घेतली आहे.
गुरूवारी मालखेड फाटा येथे वाहनांची तपासणी सुरू असताना स्कोडा कारमध्ये (क्र. एम. एच. 09 डी. एक्स. 8101) दीड लाखाची रोकड सापडली. कार चालक जयजीत जयकुमार परितकर (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) याच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना त्याबाबत समाधानकारक खुलासा करता आला नाही. त्यामुळे स्थिर पथकाचे प्रमुख विशाल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष जगदाळे, आर. एच. महाडिक, ए. एस. आगे व महिला पोलीस एस. एन. कांबळे यांच्या पथकाने ती रक्कम पंचनामा करून पंचांसमक्ष ताब्यात घेतली.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गांवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून त्याठिकाणी स्थिर पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. कराड तालुक्यात सहा ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर गेल्या चार-पाच दिवसांत रोज रोकड सापडण्याच्या घटना घडत आहेत. आचारसंहिता काळात 50 हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. त्यापेक्षा अधिक रक्कम आढळल्यास ती ताब्यात घेण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |