02:21am | Mar 08, 2020 |
कराड : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंत राव मोहिते, लोकनेते राजारामबापू पाटील, जेष्ठ विचारवंत रफिक झकेरीया यांचे सध्या जन्म शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने या सर्वांच्या कार्य कर्तृत्वाचे स्मरण व्हावे या करिता, येत्या 11 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई येथील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठ पत्रकार कुमार केतकर,मधुकर भावे,व सनदी अधिकारी श्री,गोडबोले या वेळी आपले विचार मांडून या दिवंगत नेत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आपल्या विचारातून करणार आहेत. विधानसभा व विधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.,अशी माहिती कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.इंद्रजित मोहिते यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्रीगण व माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
ते म्हणाले,राज्याच्या सुव्यवस्थित बांधणीसाठी या चार लोक नेत्यांचं योगदान फारच मोठं आहे.यांनी बहुजन लोकांना केंद्रबिंदू मानून त्या काळात केलेलं काम आजही राज्याच्या पटलावर आदर्शवत म्हणूनच आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज समाज कारण होण्याची गरज आहे.आम्हाला या गौरव सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभलं म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आहे.जुन्या जाणत्या या नेत्यांचा गौरव सोहळा आयोजित केल्याने सध्याच्या सरकारची वाटचाल योग्य चालु आहे असही त्यांनी सांगितलं.
कृष्णा कारखान्याची निवडणूक शासनाच्या धोरणानुसार पुढे ढकलली गेली असली तरी,आम्ही या निवडणुकीसाठी सज्ज आहोत.भाऊंच्या विचारांची बांधिलकी मानणारा कोणीही,आणि कोणत्याही पक्षाचा कार्यकर्त्यांचं या निवडणुकीसाठी आम्ही आमच्या बाजूने स्वागत करणार आहोत. पक्षविरहीत आणि शेतकरी हाच पक्ष म्हणून आम्ही सर्व समावेशक अशी या निवडणुकीसाठी बांधणी करून उतरणार आहोत.आजही कारखाना भाऊंच्या विचाराने कजळतो आहे.उभा राहिला आहे म्हणूनच शेतकऱ्यांना चांगले दिवस आज पहायला मिळत आहे.भाऊंच्या विचारांचा सहकार शेतकऱ्यांना आता अपेक्षित आहे.सहकार हा सर्वच राजकारणाचा मुख्य कणा मानला गेला आहे.त्यामुळे साखर कारखानदारी वजा करून राज्यच राजकारण व सहकार धूर असल्याचं त्यांनी सांगितलं.
कृष्णेच्या निवडणुकीदरम्यानचा प्रचार हा सत्ताधाऱ्याकडून सभासदांच्या हिताचा केला गेला नाही,तर तो शेतकऱ्यांनाची फसवणूक करणारा होता.दर्जेदार नव्हता.खासगी कारखाने सहकाराला धोकादायक ठरू पाहत आहेत,त्यामुळे भविष्यात सहकार क्षेत्राला त्याचे आव्हान असेल. त्याचे असणारे तंत्रज्ञान, कामगार भरती प्रक्रिया, व आधुनिकता सहकारी करखान्यापेक्षा सरस असल्याने सहकार प्रक्रिया टिकवण्याचे मोठे आव्हान या निमित्ताने आहे.
मी या पूर्वीच्या कृष्णेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आवर्जून जात होतो,मात्र जेव्हा पासून लोकशाहीला मारक अशी या सभेची पद्धती सुरू झाली तेव्हा पासून तिथे जात नाही.खोट्या केसेस करणे,जाळ्या लावणे, बॅरिगेट्स ने अडआडवी करणें अशा पद्धती ने आता या सभा होत असल्याने आपण त्या ठिकाणी जात नसल्याचं मोहिते यांनी सांगितले.
भाऊंचा गौरवसोहळ्याला आम्ही कुटुंबीय जाणार आहोत, असे इंद्रजित मोहिते म्हणाले. त्यावेळी एक कुटुंब म्हणून तुम्ही भोसले कुटुंबियांना या सोहळ्यामध्ये आमंत्रित करून सामील करून घेणार का? अस यावेळी विचारले असता, भाऊंच्या जन्म शताब्दी कार्यक्रमाला भोसलेंना मी बोलावले असता ते बोलावून आले नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम शासनाने आयोजित केला आहे आणि भोसलेंना बोलवायचं का नाही हे शासन ठरवेल, असेही मोहिते यावेळी म्हणाले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |