RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पंढरीच्या वारीनंतर कमिशनसाठी लोकप्रतिनिधी ठेकेदारांच्या दारी

11 July 2019 at 18:34

सातारा : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. परंतू पावसाळा सुसह्य होण्याऐवजी रस्त्यातील खड्ड्यांमुळे असह्य होवू लागला आहे. मात्र, ज्या जनतेच्या जिवावर लोकप्रतिनिधी निवडून जातात, तेच लोकप्रतिनिधी रस्ते ठेकेदारांच्या दारात कमिशनरुपी भीक मागण्यासाठी उभे राहत असल्यामुळे ठेकेदारांसह सामान्य जनतेची कुचंबना होवू लागली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, कृषी, जिल्हा परिषद यांसह अनेक संस्था आहेत. यांच्या मार्फत रस्ते तसेच प्रकल्पांची कामे मार्गी लावली जातात. मात्र, ही कामे किती सदोष असतात, हे या पावसाळ्यामध्येच उघड झाले आहे. असे असतानाही अशा ठेकेदारांच्या गचांडीला पकडून निकृष्ठ दर्जाच्या कामाचा जाब विचारण्याऐवजी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकांसाठी ‘चंदा’ जमा करण्याच्या नावाखाली हेच लोकप्रतिनिधी ठेकेदारांच्या दारात जावून कमिशनची भीक मागत आहेत, असे चित्र जिल्ह्यात काही ठिकाणी दिसत आहे. लोकप्रतिनिधींच्या या चंदाबाजीमुळे मात्र ठेकेदार मेटाकुटीस आले आहेत. अधिकार्‍यांनाही द्यायचे आणि लोकप्रतिनिधींनाही द्यायचे, तर राहिलेल्या पैशात पुढचे काम कसे करायचे, असा प्रश्‍न ठेकेदारांना पडलेला आहे. जिल्ह्यात अनेक छोटे-मोठे बांधकाम ठेकेदार आहेत. कामाच्या निविदा सुटल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अनेक ठेकेदार टेंडर भरत असतात. पाच लाखांच्या पुढे कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांसाठी टेंडर भरले जातात. ज्याचे टेंडर सर्वात कमी असेल, त्याला ते काम दिले जाते. वास्तविक काम जर शंभर रुपये असेल, तर ते काम ऐंशी रुपयात कसे होणार? त्यासाठी ठेकेदारांना ‘मापात पाप’ करावेच लागते. वरुन बिल काढण्यासाठी अधिकार्‍यांना कमिशन द्यावे लागते. असे असतानाच जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी मात्र आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘चंदा’ जमवण्यास सुरुवात केली आहे. 

मर्जीतील बांधकाम ठेकेदारांसह छोट्या-मोठ्या ठेकेदारांना लोकप्रतिनिधींचे खास पंटर सोडत नसल्याने असे ठेकेदार मात्र मेटाकुटीला आले आहेत. एकतर काम निकष्ठ दर्जाचे करायचे, वरुन अधिकार्‍यांना कमिशन द्यायचे आणि लोकांच्या जिवावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे हात ओले करायचे. या चक्रव्ह्यूहात मात्र जिल्ह्यातील ठेकेदार सापडलेले आहेत. पैसे दिले नाहीत, तर पुढचे काम मिळणार नाही, या भीतीने धास्तावलेले ठेकेदार गपगुमान चंद्याची थैली लोकप्रतिनिधींच्या पंटरच्या हातात ठेवत आहेत. जिल्ह्यातील तारळी धरणाला लागलेल्या गळतीनंतर जलसंपदा विभागाच्या आब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.तत्कालीन जलसंपदा मंत्री व अधिकार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळेच तारळी धरणाला गळती लागल्याचा आरोप सातार्‍यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यापासून कोणताही बोध न घेता लोकप्रतिनिधी मात्र आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपले टार्गेट पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. मात्र याचा फटका ठेकेदारांना बसलेला आहे. अनेक ठेकेदारांनी याबाबत नापसंती व्यक्त करुन ‘सातारा टुडे’कडे आपली कैफियत व्यक्त केली आहे. सातारा टुडे कडे या लोकप्रतिनिधींच्या नावासह पुरावे आहेत. योग्यवेळी लोकप्रतिनिधींची नावे व पुरावे प्रसिद्ध केले जातील.

अवघड आहे सगळं.अतिशय चुकत चाललंय. मागणी तसा पुरवठा... जनतेने विचार करण्याची गरज आहे.


जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

5 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before