02:50pm | Apr 17, 2018 |
सातारा : घरबसल्या जगात कोठूनही इंटरनेट किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा महावितरण कंपनीने सुरू केल्यानंतर ग्राहकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सद्य:स्थितीत बारामती परिमंडलात वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्यांची संख्या अडीच लाखाच्या घरात पोचली आहे. मार्च महिन्यात ग्राहकांनी ऑनलाइन माध्यमातून ३० कोटी ३५ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला आहे.
वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्यात बारामती परिमंडलातील ग्राहक सुरुवातीपासूनच पुढे आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळामध्ये सुमारे दीड लाख ग्राहक ऑनलाइन माध्यमातून वीजबिल भरत होते. मात्र, प्रत्येक महिन्याला त्यात भरच पडत चालली आहे. मार्चच्या एका महिन्यातील आकडेवारीनुसार या महिन्यात २ लाख ४५ हजार ३६२ ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरले. या आकडेवारीवरून बारामती परिमंडलात ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसते. बारामती परिमंडलांर्तगत बारामती मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर, भोर या तालुक्यांत तसेच सातारा व सोलापूर मंडलांतही ऑनलाइन वीजबिल भरण्यास मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
महावितरणची वेबसाईट, मोबाइल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून वीजबिल भरता येते. महावितरणच्या mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे जून २०१६ पासून वीजग्राहकांसाठी मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपद्वारे चालू आणि मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडीट/डेबीट कार्डसह मोबाइल वॉलेट आणि कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. वीजबिल भरल्यानंतर पावतीचा तपशीलही उपलब्ध करून दिला जातो. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्यांबाबतही ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणचे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
मार्च महिन्यात बारामती परिमंडलात ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांमध्ये बारामती मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर, भोर या तालुक्यांत ४५ हजार ६२९ वीजग्राहकांनी ८ कोटी २६ लाख रुपये ऑनलाइन भरले. सातारा मंडलातील १ लाख ३९ हजार ७१४ ग्राहकांनी १२ कोटी ४१ लाख, तर सोलापूर मंडलातील ६० हजार १९ वीजग्राहकांनी ९ कोटी ६८ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरले आहे. शहरी भागाबरोबरच सध्या ग्रामीण विभागातही ऑनलाइन वीजबिल भरणा वाढला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |