पुणे : लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने या तरुणांवर झडप घातली.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत. सर्वांना लोणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे : शुभम रामदास भिसे (वय १९), विशाल सुभाष यादव (वय २०), निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०), अक्षय चंद्रकांत शिगे (वय २०), ऋषिकेश गणेश यादव (वय २०), अक्षय भरत वायकर (वय २२), नूरमोहम्मद आबास दाया (वय २२), परवेज अशपाक आतार (वय २१), जुबेर अजीज मुलाणी (वय २१).
दत्ता गणेश यादव हा जेएसपीएम कॉलेज (उंड्री) येथे शिकत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटल येथे बाऊन्सर म्हणून काम करीत होता. विशाल सुभाष यादव हा जेएसपीएम कॉलेज, वाघोली येथे शिकत होता. शुभम भिसे (कासुर्डी) हा उरुळी कांचन येथील कॉलेजमध्ये बीसीएसला होता.
अक्षय चंद्रकांत घिगे हा हडपसर येथील आणासाहेब मगर महाविद्यालयात बीसीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. विशाल सुभाष यादव हा यवत येथील माजी उपसरपंच सुभाष यादव यांचा मुलगा आहे
सोनू उर्फ नूर महम्मद दाया हा लोणी काळभोर येथे बीए़च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. अक्षय भरत वायकर हा घरी व्यवसाय करीत असे. जुबेर अजित मुलानी हा एके ठिकाणी कामाला जात होता. परवेज अश्फाक अत्तार हा पूना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकत होता.परवेजचे वडील आठवडी बाजारामध्ये काथ्या साबण विक्रीचे दुकान लावतात. त्यांच्या त्या व्यवसायावर त्यांनी परवेजला बीसीएच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. तो शेवटच्या वर्षाला होता. या वर्षी पास झाल्यावर एका चांगल्या कंपनीत कामाला लागून वडिलांचे स्वप्ने पूर्ण करायचे आहे, असे आम्हाला परवेज सांगायचा. पण त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिले, असे परवेजचा भाऊ मोहसीनने सांगितले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |