03:01am | Jan 14, 2020 |
कराड : महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असणारी पुणे येथील मान अभिमान विकास फाउंडेशन या संस्थेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते आणि कराडचे थोर सुपुत्र ऑलिंपिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि. 15 जानेवारी 2020 रोजी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) कराड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार आणि शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीचे संकल्पक मा श्री श्रीनिवास पाटील साहेब यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर श्री मळाई देवी ग्रुपचे संस्थापक शेती मित्र अशोकराव थोरात यांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, भारत केसरी पैलवान विजय गावडे पुणे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, फेटा, मानधन असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
हा पुरस्कार महाराष्ट्रातील थोर व्याख्याते आणि हिंदकेसरी दीनानाथ सिंह उर्फ अण्णा यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीशजी कदम साहेब, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक अजय साळुंखे साहेब, पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. विनोद कदम या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, प्रा.पैलवान अमोल साठे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पिसाळ साहेब यांनी दिली.
हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचे व्याख्यान ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे तरी परिसरातील क्रीडाप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |