02:10am | May 30, 2019 |
कराड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर येथील बस थांब्यावर एसटीची वाट पहात थांबलेल्या एकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याकडील तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात दोन तोतयांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद सयाजी तुकाराम बाबर रा. जखिणवाडी ता. कराड यांनी शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुळचे जखिणवाडी गावचे रहिवासी सध्या कात्रज-पुणे येथे स्थायिक झालेले सयाजी बाबर हे नातेवाईकांच्या लग्नासाठी दोन दिवसांपूर्वी जखिणवाडीत आले होते. ते वारणा जि. कोल्हापूर येथे लग्न समारंभाला जाण्यासाठी बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर बसथांब्यावर एसटीची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण बाबर यांच्याजवळ आले. त्यांनी बाबर यांना 'आम्ही पोलीस आहोत तुम्ही अंगावर सोने घालायचे नाही. ते काढून तुमचे खिशात ठेवा' असे बजावले. त्यानंतर त्यामधील एकाने बाबर यांचा रूमाल मागून घेतला. त्याने बाबर यांच्याकडील सुमारे ४0 हजार रूपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन व १६ हजार रूपये किंमतीच्या प्रत्येकी ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. हे दागिने रूमालात बांधल्याचा बहाणा करत हातचलाखीने काढन घेतले. त्यानंतर गाठ मारलेला रूमाल त्याने बाबर यांच्याकडे दिला व ते कराडच्या दिशेने निघून गेले. बाबर यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तोतयांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दुचाकीवरून सुसाट निघून गेले. याबाबत बाबर यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून शहर पोलिसांनी अज्ञात दोन तोतयांवर गुन्हा नोंद केला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |