- अजित जगताप
सातारा : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गेली 12 दिवस सातारकर जनता संयम राखून घरी सुरक्षित आहे. त्यांना वेळेत चहा, नाष्टा, जेवण बनविण्याची जबाबदारी गृहिणी सांभाळत आहेत. या जेवणासाठी आवश्यक असणारा गॅस सिलिंडर सातार्यात निर्जंतुकीकरण करुनच घरोघरी पोहोचवला जात आहे, ही समाधानाची बाब असून गॅस सिलिंडर चालकांना सातारकर धन्यवाद देत आहेत.
सातारा जिल्ह्यात साधारण 5 लाख गॅस सिलिंडरधारक आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंन्डेन या कंपन्यांमार्फत धारकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात 25 पेक्षा जास्त एजन्सीज मार्फत गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचतो. गेल्या वर्षी महापूर आल्यामुळे अनेकांना नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागला होता. काहींच्या संसारोपयोगी वस्तूंसोबतच गॅस सिलिंडरसुद्धा वाहून गेले होते. तरीही मानवता भावनेतून गॅस सिलिंडर एजन्सीजचे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गॅस सिलिंडरचा पुरवठा केला होता. सध्या लॉक डाऊन आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता सातारा तालुका खरेदी-विक्री संघासोबत जिल्ह्यातील अनेक एजन्सीजने गॅस सिलिंडरचे निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच डिलिव्हरी बॉय ना अत्यावश्यक काळजी घेण्यासाठी मास्क, हाताला सॅनिटायझर तसेच हॅण्ड ग्लोव्हजचा पुरवठा केला आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून खेड्यापाड्यातून आलेली मुले डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत आहेत. त्यांच्याही घरी परिवार असून ते सिलेंडर वाटप करताना दररोज 200 ते 250 लोकांच्या संपर्कात येतात. लॉक डाऊनच्या काळात घरापासून लांब असलेले डिलिव्हरी बॉय अन्नदाता लोकांना हातभार लावीत आहेत. त्यांच्या जिविताला धोका झाल्यास त्यांनाही विमा कवच मिळणे गरजेचे आहे. हे डिलिव्हरी बॉय सुशिक्षित व धडधाकट असतात. लोकांच्या अडचणी ओळखून लिफ्ट नसलेल्या इमारतीत चार ते पाच मजल्यापर्यंत सिलिंडर घेवून जातात. जिल्ह्यात 6 लाख 14 हजार 184 शिधापत्रिका धारक आहेत. यातील कराडमध्ये 1 लाख 23 हजार 722, सातारा 95 हजार 436, पाटण 64 हजार 529, फलटण 71 हजार 186, खंडाळा 28 हजार 279, खटाव 61 हजार 683, कोरेगाव 54 हजार 7, माण 47 हजार 728, वाई 34 हजार 729, जावली 23 हजार 757 व महाबळेश्वर 9 हजार 828 अशी शिधापत्रकधारकांची संख्या असून यातील 75 टक्के ग्राहक गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यामुळे हे गॅस सिलिंडर निर्जंतूक करणे गरजेचे आहे. काही महिला आजही काळजीपूर्वक बाहेरुन आलेल्या वस्तू धुवून, पुसून स्वच्छ करून घेत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका नसतो. सणासुदीला गॅस सिलिंडरची मागणी जास्त असते. तशा पद्धतीने कुटूंबातील लोक घरातच असल्यामुळे सध्या गॅस सिलिंडरची मागणी वाढली असली तरी नियमानुसारच प्रत्येकाला सिलेंडचे वितरण होते, अशी माहिती सातारा खरेदी-विक्री संघाच्या गॅस एजन्सीचे मॅनेजर इंदलकर व म्हसवडमधील शुभम गॅस एजन्सीच्या सौ. सुवर्णा पोरे यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |