12:05am | Dec 19, 2018 |
कराड : वारूंजी, ता. कराड येथील विद्यमान सरपंच पैलवान पदम्सिंह उर्फ प्रमोद पाटील यांनी त्यांच्या एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दि. १७ डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी आबासोा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सतीश पाटील, मोहन चव्हाण उपस्थित होते. पाटील यांच्या राजीनाम्याने वारूंजी गावच्या राजकारणाला नवीन दिशा मिळाली असून राजकारणातील शब्द पाळल्याने त्यांच्या राजकीय उंचीत वाढ झाली आहे.
वारूंजी गावीचे सरपंच पद सर्वसाधाण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भविष्यातील सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे हे लक्षात घेऊन सार्वत्रिक निवडीनंतर सरपंच पदासाठी रोटेशन पध्दतीचा अवलंब करण्यात आला. सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना यात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्यांदा महादेव पाटील यांना सरपंच पदाची संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर पैलवान प्रमोद पाटील सरपंच पदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र, ते सरपंच झाल्यास भविष्यातील रोटेशन पाळतील का? याबाबत धास्ती असल्याने त्यांच्याच पार्टीतील काही मंडळींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना विरोध केला होता.
मात्र, त्या सर्व संकटांवर मात करत पैलवान प्रमोद पाटील हे एक वर्षासाठी दि. १६ डिसेंबर २०१७ रोजी बिनविरोध सरपंच झाले. त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्यांनी दि. ३ डिसेंबर रोजी त्यांच्या सरपंच पदाच्या निवडीत प्रमुख भुमिका बजवणाऱ्या मंडळींकडे त्यांनी आपला राजीनामा देऊन ठेवला होता. हा राजीनामा मुदत संपताच दि. १७ डिसेंबर २०१८ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे सुर्पुद करण्यात आला आहे.
चोख प्रत्योत्तर...!
वारुंजी गावात अनेक लोकांना सरपंच, उपसरपंचांसह विविध संस्थावर विराजमान करण्यात उत्तमराव पाटील यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. मात्र त्यांचा मुलगा पैलवान प्रमोद पाटील सरपंच होताना त्यांना नसती काथ्याकूट करण्याची वेळ आली. अनेकांनी त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर आक्षेप घेतले. सरपंच झालेतर ते राजीनामा देणार का? त्यांना कोणी राजीनामा मागायचा? असे अनेक प्रश्न निर्माण केले गेले. या प्रश्नांना राजीनाम्यातून उत्तमराव पाटील यांनी चोर प्रत्योत्तर दिले आहे.
उत्तमराव पाटील म्हणजेच शब्द..!
सरंपच पदाच्या लढाईत झालेल्या उलथा पालथीनंतर राजकारणात आम्ही शब्द पाळतो. राजकारणात आमच्यासाठी शब्दलाच महत्व आहे हे उत्तमराव पाटील व पैलवान प्रमोद पाटील यांनी दाखवून दिले आहे. या कुटुंबाच्या राजकीय करकीर्दीवर घाला घालू पाहणाऱ्यांना ही खरी चपराख असल्याचे बोलले जात आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |