नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राष्ट्रपतींच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता दोषी मुकेशच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी राष्ट्रपतींनी मुकेशची दया याचिका फेटाळून लावली होती. याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
निर्भया प्रकरणातील चार आरोपींपैकी एक मुकेश आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती. राष्ट्रपतींनी ही याचिका का फेटाळली याचा न्यायिक तपास करण्यात यावा, अशी मागणी करीत मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी मुकेशकडून वकील अंजना प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली असा दावा मुकेशने याचिकेतून केला होता. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंहची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. त्याला त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींसाठी फाशीची कोणती तारीख निश्चित केली आहे? डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे का?, असे प्रश्न सुप्रीम कोर्टाकडून तिहार कारागृहाला विचारण्यात आले असून त्यावर कारागृह प्रशासन आज उत्तर देणार आहे.
१ फेब्रुवारी रोजी दोषींना फाशी
दरम्यान, निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता चौघांनाही फाशी देण्यात येणार असून फाशी टाळण्यासाठी दोषींची विविध मार्गांनी धडपड सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |