बेंगळुरू : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी असलेला ऋषिकेश देवडीकर धनबादमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती एसआयटीला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून ऋषिकेशच्या मुसक्या आवळल्या.
कतरासमधील व्यापारी प्रदीप खेमका यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर ऋषिकेश काम करत होता. त्याने आपली ओळख लपवली होती. वेगळ्याच नावाने तो तिथे वावरत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात यश मिळवले. ऋषिकेश जिथे वास्तव्याला होता त्या घराची झडती घेतली जात असून त्यात काही महत्त्वपूर्ण दस्तावेज व माहिती हाती येण्याची शक्यता आहे.
ऋषिकेशला आज धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत आणून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, प्रसिद्ध कवी आणि पत्रकार पी. लंकेश यांच्या कन्या गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरूत हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी या 'लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |