फलटण : उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाकडे निंबळक, ता. फलटण येथे आलेली महाविद्यालयीन १८ वर्षीय तरुणी आज शनिवार दि. २१ रोजी सकाळी ९ वाजता नीरा उजव्या कालव्यात वाहून गेली असून पोलीस व ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कु. प्रियांका सुनील घोडके, वय १८, रा. रुई, ता. बारामती सुट्टीसाठी मामा विक्रम लालासाहेब भोसले, रा. निंबळक ता. फलटण यांच्याकडे आली होती. आज शनिवार सकाळी मामा सोबत निंबळक गावाशेजारुन वाहणाऱ्या नीरा उजवा कालव्यावर गेली असता, मामा पोहण्यासाठी कालव्यात उतरुन पोहोत कालव्याच्या दुसऱ्या काठावर गेले असताना, कु. प्रियांका घोडके हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरली मात्र पाय घसरुन पाण्यात पडली कालवा पूर्ण क्षमतेने भरुन वहात असल्याने पाण्यात पडताच कु. प्रियांका पाण्याबरोबर वाहून जाताना शेजारी पोहणाऱ्या मामाने पाहिले आणि तो लगेच झेपावला, मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की, क्षणार्धात कु. प्रियांका दिसेनाशी झाली.
मामा व इतरांनी मोठ्याने आरडा ओरडा करुन परिसरातील लोकांना मदतीचे आवाहन केले मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे कोणाचेच काही चालले नाही.
दरम्यान पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी या दुर्घटनेची माहिती पोलिस दुरक्षेत्र बरड आणि ग्रामीण पोलीस ठाणे फलटण यांना कळविल्यानंतर सहाय्यक फौजदार डी. आर. पाडवी यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन मुलीच्या मामाकडून माहिती घेतली, दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करीत पोलीस यंत्रणेमार्फत शोध घेण्याचे आश्वासन कुटुंबीय व ग्रामस्थाना दिले.
दरम्यान ग्रामस्थ, पोलीस कालव्यात कु. प्रियांकाचा शोध घेत आहेत. कालव्याच्या काठावर सकाळपासून प्रचंड गर्दी झाली आहे, मात्र कोणालाच शोध लागत नसल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |