कोरेगांव : संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या जलसंधारण कार्यासाठी शिवकृपा सहकारी पतपेढीने सामाजिक जाणीवेतून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असून जांब बुद्रुक (ता. कोरेगांव) येथील पाणी फौंडेशनच्या कामासाठी शिवकृपाने 20 हजार रुपयांचा धनादेश जांब ग्रामस्थांकडे नुकताच सुफूर्त केला.
जांब बुद्रुक गांव हे संपूर्ण महाराष्ट्रात जागृत समजल्या जाणार्या श्री जरंडेश्वर डोंगराच्या कुशीत वसले असून हे गाव दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार करुन या गावाने सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक नागरीक, अबाल-वृध्द, तरुण, महिला, विद्यार्थी या श्रमदानात सहभागी झाले असून गावाबाहेरीलही अनेकांनी या चळवळीला हातभार देण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच दगडी बंधारे, मातीचे बंधारे, डोंगर उतारावर चर खुदाई, विहीर पुर्नभरण, पाझर तलावातील गाळ काढणे, दुरुस्ती करणे, रोपवाटीका तयार करणे या सारखी कामे श्रमदानातून साकारली जात आहेत. ग्रामस्थांच्या श्रमदानातून सुरु असलेल्या या पाणी आडवा, पाणी जिरवाच्या संकल्पनेला शिवकृपा सहकारी पतपेढीने सहकार्य करण्याचे निश्चित करुन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णा शेलार, संस्थापक संचालक चंद्रकांत वंजारी यांनी जांब गावाला भेट देवून श्रमदान करणार्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना भरभरुन दाद दिली आणि या संपूर्ण कामासाठी शिवकृपाच्या वतीने 20 हजार रुपयांचा धनादेशही ग्रामस्थांकडे बहाल केला.
शिवकृपा पतपेढीच्या समाजकल्याण व विकास निधीतून ही रक्कम पाणी फौंडेशनच्या कार्याला देत एक सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी संस्थापक, अध्यक्ष कृष्णा शेलार म्हणाले. या मदतीबद्दल जांब ग्रामस्थांनी शिवकृपा पतपेढीच्या पदाधिकारी, संचालकांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले-निकम, इंडियन ऑईलचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक विष्णू निकम, पोलीस पाटील सुधाकर निकम, अरुण निकम, सुधीरभाऊ निकम, आनंदराव निकम, सचिन निकम यांच्यासह, शिवकृपाचे अधिकारी, कर्मचारी, जांब, भिवडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |