10:12pm | May 29, 2018 |
सातारा : वादळी पावसामुळे फलटण तालुक्यात विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करत सर्व कौशल्य पणाला लावले. मंगळवारी दुपारपर्यंत बहुतेक भागांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. वादळात मोठमोठी झाडे पडल्यामुळे फलटण तालुक्यात महावितरणचे तीनशेहून अधिक वीजखांब जमीनदोस्त झाले. ठिकठिकाणी तारा तुटल्या होत्या.
रविवारी रात्री वादळी पावसाने फलटण तालुक्यास झोडपून काढले. ठिकठिकाणी मोठेमोठे वृक्ष उन्मळून पडले, झाडांच्या फांद्या तुटल्या. याचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आणि अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर लगेच महावितरणचे अभियंते, जनमित्र तसेच ठेकेदाराची ८ पथके वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी सर्व ठिकाणी एकाच वेळी रवाना झाली.
रविवारी रात्रीच अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अढथळा आला. वीजखांबांवर कोसळलेली झाडे व फांद्या कापून बाजूला काढणे, त्यानंतर खांब उभारणे आणि शेवटी तारा ओढणे अशा टप्प्यात ही कामे केली गेली. फलटण शहर तसेच तालुक्याच्या बहुतेक गावांत वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. ग्रामीण भागात कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित असून, तोही पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरणचे अभियंते, जनमित्र व ठेकेदाराचे कामगार अशा २५० जणांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम केले, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
या आपत्तीत उच्चदाब वाहिनीचे ६४, लघुदाब वाहिनीचे २४१ वीजखांब कोसळले. तर ९ रोहित्रे जमीनदोस्त झाली असून, ३२ रोहित्रे नादुरुस्त झाली. जवळपास २६ किमी अंतराच्या वीजतारा तुटल्या. महावितरणचे प्रथमदर्शनी १ कोटी रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |