02:15am | Jul 18, 2019 |
नवी दिल्ली : माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी अमित शहा यांनी माढा मतदारसंघातील प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करुन हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे. माढा मतदारसंघातील पाणीप्रश्न व प्रलंबित रेल्वे प्रकल्पाबाबत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मार्गी लावण्याचा शब्द निवडणुकीत मतदारांना दिला होता. या शब्दांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आज दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी माढा मतदारसंघातील नीरा-भीमा स्थैर्यीकरण प्रकल्प, नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित कामे तसेच फलटण-बारामती व फलटण-पंढरपूर रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात प्रामुख्याने सविस्तर चर्चा केली. यानंतर अमित शहा यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी तसेच अधिकार्यांशी त्वरित दूरध्वनीवरुन संपर्क साधून हे प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. माढा लोकसभा मतदारसंघातील इतर विविध प्रश्नांसंदर्भातही शहा यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. तसेच माढा या प्रतिष्ठेच्या बनलेल्या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल शहा यांनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, माढा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी अपुरा पडू दिला जाणार नाही, या मतदारसंघातील दुष्काळाचा कलंक कायमस्वरुपी पुसण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |