10:47pm | Dec 31, 2018 |
कराड : मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पार्टीने आज मलकापूर नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असता त्याला उदंड प्रतिसाद लाभला. नगराध्यक्षपदासह 20 जागांसाठी होणार्या या निवडणुकीच्या मुलाखतीसाठी 119 जणांनी उपस्थिती लावली. यामध्ये महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.
मलकापूर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वच इच्छुकांनी आत्तापासूनच आपापल्या पातळीवर मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरवात केली असून, भाजपाच्यावतीने आज मलकापूरातील खंडोबानगर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपाचे प्रदेश चिटणीस नामदार डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, मोहनराव जाधव, आर. के. भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विविध प्रभागातील उपस्थित इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदारांची माहिती, समस्या, समाजकारण व राजकारणाचा वारसा याबाबत सविस्तर विवेचन करत नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. काही इच्छुकांनी तर थेट मलकापूरातील सत्ताधार्यांवर शाब्दिक हल्ला चढवत त्यांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली.
मलकापूर नगरपालिकेसाठी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असून, नगराध्यक्षपदासाठी 12 इच्छुक महिलांनी मुलाखती दिल्या. यामध्ये मानसी शशिकांत राजे, डॉ. सारिका प्रशांत गावडे, दिपाली आबासाहेब गावडे, सुवर्णा रवींद्र येडगे, माजी जि.प. सदस्य भारती अनिल कडव, दिपा राहूल भोसले, अश्विनी संतोष हिंगसे, विद्याराणी हणमंतराव कराळे, रजनी सुभाष माने, गौरी सुनील कोळी, प्रियांका भारत जंत्रे, रूक्मिणी बाळासो जंत्रे यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना नामदार डॉ.अतुल भोसले यांनी भाजपाच्या मुलाखतींना इच्छुकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मलकापूरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून, भाजपच्या नेतृत्वामुळे भविष्यात या शहराला निधीची कमतरता भासणार नसल्याचे प्रतिपादन मदनराव मोहिते यांनी केले. अशोकराव थोरात यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मोहिते यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |