पाटण : गुरुवारी (ता. 13) रात्री सांगवड पुलावरुन कोयना नदीत उडी मारुन एका विवाहितेने दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सापडला असुन दोघांना शोधण्याचा प्रयत्न पोलिस व ग्रामस्थ करीत आहेत. राधिका मनोजकुमार माने (वय २७, राहणार म्हसवड ता. माण) असे उडी मारलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान आत्महतेचे कारण समजु शकले नाही.
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी आहे की, राधिका माने यांचे माहेर सांगवड असुन त्या पाच-ते सहा दिवसांपुर्वी माहेरी श्रावण (वय - तीन) व शिवराज (वय - नऊ) महिने या दोन मुलांना घेऊन आल्या होत्या. गुरवारी (ता.12) रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर सर्वांच्या लक्षात राधिका व तिची दोन मुले घरात नाहीत हे लक्षात आले. शेजारी चौकशी केली, पुन्हा गावात शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. दुरध्वनीवरुन पै-पाहुण्यांकडे चौकशी केली.दुपारी राधिकाचे चुलते कृष्णत काशिनाथ पाटील हे कोयना नदीकाठी गेले असता लहान मुलाचा मृतदेह नदीपात्रात तरंगत होता. कृष्णत पाटील यांनी नातेवाईकांना सांगितले व घरातील माणसांनी नदीकडे धाव घेतली. सदर मृतदेह शिवराजचा असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. ही बातमी गावात समजल्यानंतर नदीकाठी गर्दी झाली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरिक्षक शिशिर शिंदे पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
अद्याप राधिका व तीन वर्षाचा श्रावण यांचा शोध लागलेला नाही. नदीपात्रात पाणी जास्त असल्याने पोहणारांना शोध मोहिम राबविण्यासाठी बोलविण्यात आले आहे मात्र अंधार पडु लागल्याने शोधमोहिम शनिवारी (ता. 14) सकाळी करावी लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |