01:09am | Jan 17, 2020 |
सातारा : धोम हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने गुरुवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी ‘संतोष पोळ याने माझ्या समोर तीन खून केले असून त्यापूर्वी त्याने एकट्याने तीन खून केले असल्याचे सांगितले आहे,’ अशी साक्ष दिली. माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने पोळ याच्याशी मंदिरात लग्न केले असल्याचीही माहिती दिली. दरम्यान, वाई हत्याकांड सुनावणी उद्या पुन्हा न्यायालयात होणार आहे.
संपूर्ण जिल्ह्याला, महाराष्ट्राला व देशाला हादरवणार्या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधिश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकारपक्षातर्फे काम पाहत असून गुरुवारी ते न्यायालयात उपस्थित होते.
वाई हत्याकांड प्रकरणात अनेक घडामोडीनंतर गुरुवारी या खटल्यातील महत्वाची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हीच्या साक्षीला सुरवात झाली. साक्षीमध्ये ज्योती म्हणाली, वाई येथील डॉ. घोटवडेकर यांच्या दवाखान्यात मी काम करत असताना 2013 मध्ये तिची संतोष पोळ याच्याशी ओळख झाली. 13 आक्टोबर 2013 रोजी दोघांनी वाईतील गायत्री मंदीरात लग्न केले. त्यानंतर सहा महिन्यात काम सोडून नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घेतला. तीन वर्षांनी प्रशिक्षण पूर्ण झाले. लेखी परिक्षाही दिली. दरम्यान, तीन सिमकार्ड वापरून डॉॅ.संतोष पोळ याच्या संपर्कात असल्याची माहिती तिने दिली.
ज्योती मांढरे पुढे म्हणाली, मार्च 2015 मध्ये मला हॉस्पिटलमधून कामावरून काढून टाकल्याने पैशाची चणचण भासू लागली. संतोष पोळ याला भाड्याने ऍम्बुलन्स चालवायला दिली होती. परंतु, हप्ते न भरल्याने ती रुग्णवाहिका परत घेतली. यामुळे नोव्हेंबर 2015 मध्ये ‘तुम्ही प्रॅक्टीस सुरू करा’, असे तिने संतोष पोळ याला सांगताच त्याने ‘माझी डीग्री खोटी आहे, रजिस्ट्रेशन झाले नाही’ असे त्याने उत्तर दिले. ते ऐकूण ज्योती मांढरेला धक्का बसला. याचवेळी डॉ.पोळ याने ज्योती मांढरे हिला एक प्लॅन आहे असे त्यने सांगितले. ‘लोक मला डॉक्टर समजतात. मी तपासणीच्या बहाण्याने त्यांना बोलवतो आपण त्यांना मारून दागिणे लूटु’, असे तो म्हणाला. यावेळी मांढरे हिने आपण पकडले जाणार असे सांगितले. यावर ‘यापूर्वी मी सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड व जगाबाई पोळ’ यांचा खून केला असल्याचे त्याने सांगितले. कसे मारतो, मृतदेहाचे काय करतो याबाबत विचारणा केली. त्यावेळी इंजेक्शन द्यायचे त्यातून तो नैसर्गीक मृत्यू आल्या सारखे वाटते, कोणाला संशय येत नाही असे त्याने सांगितले. तसेच ती इंजेक्शन हॉस्पिटलमधील मित्र देतो असे त्याने सांगितले. याच माध्यमातून पुढे डॉ.संतोष पोळ याने नथमल, सलमा व मंगल जेधे यांचे खून केल्याची साक्षही ज्योती मांढरे हीने न्यायालयासमोर दिली.
सलमा जिवंत आहे असे दाखवण्यासाठी संतोषच्या सांगण्यावरून व त्याने दिलेल्या सलमाच्या मोबाईलवरून ज्योतीने सलमाच्या दोन मैत्रीणींना फोन केल्याचेही ज्योती हीने न्यायालयात सांगितले. ही सर्व साक्ष देत असताना ज्योतीला प्रकृतीचा त्रास होवू लगला. यामुळे दुपारी न्यायालयाने तिला पाणी व खुर्ची देण्यास सांगितले. अद्याप ज्योतीची साक्ष पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे शुक्रवारी पुन्हा याप्रकणी सुनावणी होणार आहे. सध्या डॉ.संतोष पोळ येरवडा येथील कारागृहात असल्याने त्याला सकाळी साडेदहापर्यंत न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायाधिशांनी पोलिसांना दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |