03:16am | Apr 18, 2019 |
सातारा : देशरक्षणासाठी कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या अंगापूर वंदन , ता. सातारा येथील वीर जवान विजय अंकुश कणसे यांची राष्ट्रभक्ती सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
जम्मू येथील राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत जवान कणसे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही जवान कणसे यांना श्रध्दांजली वाहिली.
कर्तव्य बजावताना देशाचे रक्षण करणारे जवान राष्ट्राच्या कामी येतात. त्यांचा अलोट त्याग देशवासीयांना सतत प्रेरणा देत राहील.परिणामांची तमा न बाळगता देशभक्तीचे आदर्श निर्माण करणारे वीर जवान हे खऱ्या अर्थाने देशाचे भूषण आणि आधारस्तंभ असतात. आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत देशसेवेचा वसा जपत वीर जवान कणसे यांनी स्वतः सोबतच सातारा जिल्ह्याचे नावही अजरामर केले आहे, असेही खा. उदयनराजे यावेळी म्हणाले.
राष्ट्राच्या कामी येणाऱ्या जवानांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची आबाळ होऊ नये, म्हणून सामाजिक बांधिलकीतुन समाजातील प्रत्येक जबाबदार घटकाने योगदान द्यावे, अशी अपेक्षही यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
दरम्यान, कोरेगाव येथील जवान रवींद्र कणसे यांच्या अंत्यसंस्कारावेळीही उपस्थित राहून खा. उदयनराजे भोसले यांनी वीर जवान कणसे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |