कराड : जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ऊसदर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखानदार यांच्यात झालेली बैठक निष्फळ झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल जाहीर झाली सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. गुरुवारी दुपारी कराड तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे संघटक अनिल घराळ बापू यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याकडे तसेच धावरवाडी येथे जयवंत शुगरकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर अडवले.
ऊस दरप्रश्नी धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार वास्तविक साखर आयुक्त व सहकार मंत्री यांना असतानाही केवळ औपचारिकता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तसेच अन्य शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सातारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांकडे केलेल्या मागण्या बाबत काहीच प्रतिसाद न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांनी उसाची पहिली उचल या पार्टी अधिक दोनशे रुपये म्हणजेच बारावीला 3217 रुपये पहिला हप्ता जाहीर केले खेरीज जिल्ह्यातील कोणत्याच कारखाना सुरू करू दिला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
बैठक संपल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सचिन नलावडे अनिल घराळ यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कराड तालुक्यातील कोपर्डी गावच्या हद्दीतून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे तसेच जयवंत शुगर या खाजगी कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर आडवले. उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नये असे आव्हान त्यांनी कारखानदारांसह ऊस तोडणी वाहतूक दारांना व शेतकऱ्यांना केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |