12:01am | Oct 20, 2018 |
सातारा : मंगळवारी माची पेठेत पत्नी वैशाली धनंजय खोत (वय 38) यांचा खून केल्यानंतर पती धनंजय खोत (वय 45) याचा शुक्रवारी सांयकाळी चारभिंतीनजीक मृतदेह सापडल्याने परिसर हादरुन गेला आहे. चारभिंतीनजीक दरीत मृतदेह साडपल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशीरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, खूनाच्या घटनेनंतर धनंजय खोत याची रिक्षा त्या परिसरात सापडली होती. यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, माची पेठेत खोत कुटुंबीय एक मुलगा व एक मुलगीसमवेत वास्तव्य करत आहेत. पती धनंजय खोत हा रिक्षाचाक असून पत्नी वैशाली या पिठाची गिरण व साड्यांना पिको फॉल करत होत्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोन्ही मुले कॉलेजला गेली होती. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलगी आल्यानंतर आई वैशाली खोत ही घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या घटनेने मुलगी घाबरली व आरडाओरडा करत बाहेर आली. युवती आरडाओरडा करत असल्याने परिसरातील नागरिक जमा झाले.
या घटनेची शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी वडील धनंजय खोत यांच्यावर संशय व्यक्त करुन वडीलाविरुध्द खूनाची तक्रार दिली. मंगळवारी खूनाची घटना घडल्यानंतर संशयित पती धनंजय खोत पसार होता. त्याच दिवशी त्याची रिक्षा चारभिंतीनजीक सापडली होती. पोलिसांनी परिसरात सर्वत्र पाहिले मात्र तो सापडला नाही.
गेली चार दिवस पोलिसांचा शोध सुरु असतानाच शुक्रवारी दुपारी चारभिंतीनजीक पाच ते सहा फूटाच्या खोल खड्ड्यापासून दुर्गंधी सुटली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. तोपर्यंत दुर्गंधी येत असलेल्या परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. दुर्गंधीच्या ठिकाणी पुरुषाचा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तो मृतदेह खून करुन पसार झालेला धनंजय खोत याचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती त्यांच्या दोन्ही मुलांना देण्यात आली. सायंकाळची वेळ असल्याने खोड्ड्यातून मृतदेह काढण्यासाठी ट्रेकर्स बोलवण्यात आले. रात्री उशीरा मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |