कोरेगाव : कोरेगाव ते रहिमतपूर रस्त्यावर वेलंग स्मशानभूमीनजीक गुरुवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास अचानक भगदाड पडले. तीन फुट रुंद व आठ फुट खोल खड्डा पडला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने खबरदारीचे उपाय योजले. दोन्ही बाजूला मुरूम टाकून तात्पुरता एकेरी मार्ग करून वाहतूक सुरळीत केली.
कोरेगाव - रहिमतपूरमार्गे कोरेगावकडे डबलसीट जाणार्या दुचाकीस्वाराच्या समोरच खड्डा पडल्याने त्याची चांगलीच तंतरली. त्याने प्रसंगावधान दाखवत घटनेची माहिती अन्य चालकांना व स्थानिकांना दिली.
रस्त्यावरुन दररोज होणार्या अवजड वाहनांच्या वर्दळीने मोठ्या दुर्घटनेची संभावना लक्षात घेवून सतर्क नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांना दिली. प्रांताधिकारी श्रीमती नलवडे यांनी कोरेगाव सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एम.डी. पाटील यांना ही माहिती दिली. त्यामुळे उपअभियंता एम.डी. पाटील यांच्यासह बांधकाम विभागाच्यावतीने घटनास्थळी पाहणी केली. खड्डा पडलेल्या संबंधित ठिकाणी आठ ते दहा फुट पूर्ण जमीनच खचल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून खड्ड्याच्या दोन्ही बाजूला मुरूम व झाडांच्या फांद्या टाकण्यात आल्या असून उद्या जेसीबीच्या सहाय्याने बाधीत ठिकाणी उत्खनन करून कायम स्वरुपी मजबूतीकरण करण्यात येणार असल्याचे उपआभियंता पाटील यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |