कराड : श्रीरत्न हॉस्पिटल हे कराडमधील वैद्यकीय क्षेत्रातील रोल मॉडेल आहे. तालुकास्तरावर अत्याधुनिक सुविधा वाजवी दरात उपलब्ध करून हॉस्पिटलने गरजू रूग्णांना मोठी मदत केली असल्याचे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले.
येथील श्रीरत्न हॉस्पीटलमधील नवीन आयसीयुचे उद्घाटन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, हॉस्पिटलचे डॉ. संजय पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
श्रीनिवास पाटील म्हणाले, ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये काम केलेल्या डॉक्टरांनी तेथेच न रमता कराडला आपली कर्मभूमी मानून आपल्या सखोल ज्ञानाचा वापर इथल्या रूग्णांसाठी केला ही गोष्ट वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत अत्याधुनिक आयसीयु सुरू केल्याबद्दल डॉ.पवार यांना धन्यवाद दिले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हॉस्पिटलमध्ये येणारा रूग्ण हा स्टे्रचरवरून येतो व बरा होऊन आपल्या पायावर हसत घरी जातो हेच या हॉस्पिटलचे गमक आहे. हॉस्पिटलमध्ये हजारो हृदय, पॅरॅलीस, मधुमेहाच्या रूग्णांना उपचार मिळाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तातडीच्या सेवेला महत्व असते. त्यासाठीच हॉस्प्टिलने अत्याधुनिक आयसीयु सुरू केल्यामुळे रूग्णांची चांगली सोय झाली आहे.
यावेळी हॉस्पिटलच्या उभारणीस जे डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफने योगदान दिले त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या आयसीयुमध्ये १० बेड असून ते सेव्हन पोझिशन इलेक्ट्रॉनीक बेड आहेत. त्याचप्रमाणे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी पेसमेकर, डीफेब्रीलेटर, इन्वेजीव व नॉनइन्वेजीव व्हेंटीलेटर, फाईव्ह पॅरामॉनिटर्स हे सर्व मॅानिटर्स सेंट्रलाईझड आहेत. सुत्रसंचालन पल्लवी काटकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुनंदा पवार यांनी केले. आभार गायत्री जोशी यांनी मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |