सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांचे पुण्यात आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.
सातारच्या पुरोगामी चळवळीत विद्यार्थीदशेपासून कार्यरत असलेले किशोर माधवराव तपासे (वय 63) यांचे आजाराने आज पुणे येथील दिनानाथ रुग्णालयात निधन झाले. दिवंगत कवी, साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या ‘दलित पँथर’ पासून ते दलित चळवळीशी जोडले गेले होते. सातारा जिल्ह्यातील दलित चळवळीचा चेहरा म्हणून ते ओळखले जात होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत कार्यरत होते. रामदास आठवले यांनी त्यांची रिपाइंच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यात रिपाइं हा पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चळवळी बरोबरच ते आयुर्विमा महामंडळात ते नोकरीस होते. सातारा शहरात त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. लोक त्यांना ‘भाऊ’ या नावाने ओळखायचे. ते जरी स्वत: निवडणूक लढले नाहीत, तरी त्यांनी सातारा पालिकेत स्वत:च्या ताकदीवर 6 नगरसेवक निवडून आणण्याची किमया केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. उद्या दि. 25 रोजी सकाळी त्यांच्यावर माहुली येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |