लोणंद : सालपे ता.फलटण येथील सौ. शांताबाई जयवंत खरात ( वय 70 ) या वृद्धा सोमवारी पहाटे घराबाहेर आल्या असताना त्यांचा अज्ञातांनी धारदार शस्रांनी पाठीवर वार करून निघृन खून केल्याची घटना उघडकीस आल्याने सालपे परिसरात खळबळ उडाली आहे.
सालपे ता. फलटण येथे संतोष जयवंत खरात हे आपले आई ,वडिल, कुटुंबासमवेत राहतात. आज दि. २९ रोजी पहाटे शांताबाई खरात त्यांचे घराबाहेर आल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. बराच वेळ त्या घरात का आल्या नाहीत म्हणून त्यांचे पती जयवंत खरात हे बाहेर आले असता त्यांना शांताबाई रकताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. शांताबाई यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने केलेले वार दिसुन आले. त्यामुळे शांताबाई यांच्यावर कोणी तरी खुनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याबाबत लोणंद पोलीसांना माहिती देताच लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि. गिरिश दिघावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृध्देच्या पाठीवरील धारदार शस्त्राचे वार पाहता हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट दिली आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी पंचनामा केला असुन पुढील तपास सपोनि. गिरिश दिघावकर करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |