कराड : काले (ता. कराड) गावच्या हद्दीत पाचवड फाटा ते उंडाळे जाणाऱ्या रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रविवार दिनांक 14 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर धडक देणाऱ्या वाहनासह चालकाने तेथून पोबारा केला.
अरुण भानुदास पाटील (वय 35, रा. सोनवडे, ता. शिराळा, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पाचवड फाटा ते उंडाळे जाणाऱ्या रस्त्यावर काले गावच्या हद्दीत विद्युत पारेषण कंपनी कार्यालयाजवळ रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला. आवाज कशाचा झाला हे पाहण्यासाठी पारेषण कंपनीत ड्युटीवर असलेल्या शरद भिकाजी पाटील यांनी पाहणी केली. मात्र, ट्रान्सफार्मर व इतर उपकरणे व्यवस्थित सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रस्त्यावर जाऊन पाहिले. त्यावेळी मोटरसायकलसह एकजण रस्त्यावर पडलेला दिसला. अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मोठा आवाज झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब शरद पाटील यांनी फोनवरून तालुका पोलीस ठाण्यात कळवले. तालुका पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघात व मोटरसायकल शेजारी पडलेल्या युवकाची पाहणी केली असता तो युवक मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच्याजवळ असलेल्या फोनवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच धडक देऊन पळून गेलेल्या वाहनाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. अपघाताची खबर शरद पाटील यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अनिल चौधरी करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |