कराड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधी परिसर व येथील कुष्णा घाटावरील प्रीतिसंगम बागेचा परिसर मोकळा श्वास घेणार आहे. तेथील रस्त्यावर लागणार्या दुचाकी, चारचाकी वाहनांना पोलिस, पालिकेच्या संयुक्त पुढाकाराने लवकरच बंदी घालण्यात येईल. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबलावणी केली. तेथे वाहनांना बंदी घातल्याने त्याचा ताण शहरातील अन्य रस्त्यांवर येतो. ती बाब लक्षात आल्याने पालिका त्यावर लोकप्रतिनिधीची मते घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे.
यशवंतराव चव्हाण यांचा समाधी स्मारक परिसर आणि त्या लगतच्या प्रीतिसंगम बागेत नेहमीच गर्दी असते. परिसरात चारचाकीसह दुचाकीही लावल्या जातात. त्यामुळे फिरायला येणार्यांची गैरसोय होते. तेथेच रिमोटवरील वाहने, घोडे विक्रेतेही असतात. त्याने सायंकाळी तेथून चालणेही मुश्कील बनते. त्यावरील निर्णयासाठी स्थायी समिती सदस्य व पोलिस अधिकार्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. चर्चा करुन निर्णय घेण्याचे ठरले. तेथील घोडेसवारीसह रिमोटवरील वाहनांना अन्यत्र जागा द्यावी यासाठी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. त्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे हेही आग्रही आहेत. मात्र, त्यावर पालिकेत सविस्तर चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे त्याचीही चर्चा पालिकेच्या आगामी विशेष सभेत होणार आहे.
समाधी स्मारकासह बागेच्या लगत असलेल्या रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगवर मध्यंतरी मुख्याधिकारी डांगे यांनी बंदी आणली. त्याचा निर्णय घेवून प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस त्याची अमंलबजावणीही केली. तेथील पार्किंग रद्द केल्यास शहरातील सोमवार पेठेतील पंताचा कोट, गरुड यांचे घर, रॉयल पॅलेसची बाग अशा अनेक रस्त्यांवर फिरायला येणारे नागरिक वाहनांचे पार्किंग करु लागले. पर्यायाने त्याचा ताण त्या रस्त्यावर आला. त्यामुळे अन्यत्र होणारे पार्किंग टाळून वाहनांच्या पार्किंगला वेगळा पर्याय देता येईल काय, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |