01:58am | Oct 28, 2018 |
खंडाळा : समाजसेवा हे ध्येय बाळगले तर शेवटच्या प्रवाहापर्यंत असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येणे आवश्यक आहे. सामाजिक दृष्टीकोन बाळगून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यत पोहोचण्याचे ध्येय बाळगून कार्यरत असणाऱ्या डॉ.जोगळेकर कुटुंबियांचे वैदयकीय क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून लेसर मशीनच्या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत पुणे-मुंबईच्या धर्तीवर याठिकाणी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचारपद्धती मिळणार असल्याने शिरवळचा नावलौकिक वाढण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
शिरवळ ता.खंडाळा येथील श्री सेवा मेडिकल फाऊंडेशन संचालित डॉ.जोगळेकर हॉस्पिटल याठिकाणी आधुनिक इटालियन निर्मिती असलेले क्वांटा लेसर मशीनच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी हे होते. याप्रसंगी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले , वाई अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत काळे, जेष्ठ नेते शंकरराव गाढवे ,खंडाळा पंचायत समिती सभापती मकरंद मोटे ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, खंडाळा पंचायत समिती माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील ,माजी सभापती गुरुदेव बरदाडे,खंडाळा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव , भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी ,नगरसेवक अनिरुद्ध गाढवे, श्री सेवा मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ.विनय जोगळेकर, डॉ.शिला जोगळेकर, डॉ.ओंकार जोगळेकर,डॉ.चारुता जोगळेकर , डॉ.जोत्स्ना कुलकर्णी,माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे,प्रा.रमेश देशपांडे ,ईश्वर जोशी,बापूसाहेब धायगुडे, खंडाळा तहसीलदार विवेक जाधव, सहाय्यक निबंधक नानासाहेब रुपनवर, शिरवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.विनय जोगळेकर म्हणाले, वैदयकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर मात करत रुग्णालयाची उभारणी शिरवळकरांच्या प्रेमातून करता आली आहे. शिरवळचा नावलौकिक वाढविण्याकरिता शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नशील राहणार असून शिरवळ हे युरॉलॉजिस्ट सेंटर होण्याकरीता प्रयत्नशील राहणार आहे. डॉ.ओंकार जोगळेकर म्हणाले,ज्या मातीमध्ये आपण वाढलो त्याचे ऋण फेडणे आवश्यक असते हेच ध्येय ठेऊन शिरवळकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आहे.यावेळी मदन भोसले,चंद्रकांत काळे, डॉ.संजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आधुनिक इटालियन निर्मिती असलेले क्वांटा लेसर मशीनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.ओंकार जोगळेकर,डॉ. चारुता जोगळेकर यांनी लेसर मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी डॉ.विनय जोगळेकर यांचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. विनय जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले डॉ.चारुता जोगळेकर यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |