फलटण : तालुक्यातील आठ रस्त्यांच्या कामाची फायनल बिले घेऊन गुणवत्तेचे बांधकाम साहित्य वापरल्याचा बनावट दाखला केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे फलटण पंचायत समिती सदस्य सचिन कुंडलिक रणवरे यांच्या विरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे गेल्या चार दिवसांपासून येथील अधिकारगृहासमोर उपोषणास बसले असून त्यांनी याप्रकरणी सचिन रणवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
याबाबत फलटण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सुनिल मनोहर गरुड, उप अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून सचिन कुंडलिक रणवरे रा. कोळकी, ता. फलटण यांना मक्तेदार म्हणून १) सन २०१३ सोनवडी बुद्रुक येथे महादेव मंदिर ते सावतामाळी मंदिर अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे २) सण २०१२ भाडळी खुर्द ते भवानीदेवी मंदिर रस्ता ग्रामीण मार्ग १९१ सुधारणा करणे ३) सन २०१४ ठाकुरकी वाठार मळा जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे ४) सन २०१४ सोमनथळी येथील फलटण आसू रस्ता करचेवस्ती रास्ता खडीकरण करणे ५) सन २०१४ तावडी ते वऱ्हाड लिंब रास्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ६) सन २०१४ सासकल येथे अंगणवाडी इमारत बांधकाम करणे ७) सन २०१४ झिरपवाडी अंतर्गत रास्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ८) सन २०१४ ठाकुरकी येथे ज्योतीबा नगर ते बोडरे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ही कामे दिली होती. आठही कामाची फायनल बिले सचिन रणवरे यांनी घेतली असून आठही कामाची योग्य गुणवत्तेचे बांधकाम साहित्य वापरल्याच्या दाखला उप अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उत्तर यांचेकडील पत्र जा.क्र.बांध/ आस्था/ कावि/१०९/२०१८ बांधकाम विभाग उत्तर सातारा जिल्हा परिषद सातारा येथे सचिन रणवरे यांनी जे चाचणी रिपोर्ट आमच्या कार्यालयाकडे पाठवले ते सत्य नव्हते तरी त्यावर असिस्टंट रिसर्च दक्षता व गुन नियंत्रक जिल्हा प्रयोगशाळा सातारा यांची सही व शिक्का होता यावरून मक्तेदार सचिन रणवरे यांनी जे गुणवत्ता चाचणी अहवाल आमच्या कार्यालयात सादर केला ते बनावट चाचणी अहवाल होते. या प्रकरणी फलटण पंचायत समिती सदस्य सचिन कुंडलिक रणवरे यांच्या विरुद्ध भादवी ४६५ व ४६८ अंतर्गत फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी केलेल्या मागणीला यश आल्यामुळे बोगस टेस्ट रिपोर्ट प्रकरणी अजून काही बडे माशे गळाला लागण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |