RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

11 March 2019 at 14:07

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या 12 मार्चला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. हार्दिक पटेल यांनी स्वत: ट्विटरवरुन याबद्दलची माहिती दिली.

सव्वा कोटी भारतीयांसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं हार्दिक यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. म्हणूनचं हा निर्णय घेण्यात आला. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती.

जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.

दरम्यान, 2015 मध्ये हार्दिक पटेल जेव्हा पाटीदार आंदोलन करत होता. त्यावेळी लोक त्याच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेलने आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते.

पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारचा विरोध करत गुजरातमधील स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

दरम्यान देशाचा पुढचा चौकीदार कोण असणार आहे नरेंद्र मोदी, राहल गांधी की आणखी कोणी, या प्रश्नाचं उत्तर 23 मे रोजी मिळणार आहे, कारण लोकसभेचं बिगुल वाजलं असून 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये, म्हणजे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडेल.

माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

yesterday

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18