11:46pm | May 16, 2018 |
सातारा : जुन्या पारंपरिक लावण्यांना सूर,मांडणी, अदा, देखणेपण अशा विविधांगाने सजविणार्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुना बाई वाईकर रसिकांच्या साक्षीने आज अनंतात विलिन झाल्या.आज वाई येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतीम संस्कार करण्यात आले.
यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर (102) यांचे काल सोनगिरवाडी येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. आज सकाळी फुलांनी सजविलेल्या रथात तिरंग्यात लपेटलेले पार्थिव ठेऊन त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. सोनगिरवाडी येथील कोल्हाटी समाज दफन भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी राखीव पोलीस उपनिरीक्षक राजेश पांडे यांच्या पथकाने यमुनाबाईंना बंदुकीतून तीन फैरी झाडून व शोक बिगुल वाजवून मानवंदना दिली. तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी शासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मधुकर नेराळे, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, मोहन भोसले,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शशिकांत पिसाळ,प्रतापराव पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे आदींनी पुष्पांजलीवाहिली.
जनसमुदायाच्या साक्षीने यमुनाबाई वाईकर अमर रहे, आम्ही जातो आमुच्या गावा.., चुकले तुझे बाळ.. ये ना माझे आई गं.. अशी गीते गात अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली. अंत्ययात्रा जुने तहसिल कार्यालय, पोस्ट ऑफीस, पंचायत समिती कार्यालय, द्रविड हायस्कूल मार्गे दफनभूमीत पोहचली. मार्गामध्ये अबालवृध्द स्त्री पुरषांनी दर्शन घेतले.
उपनगराध्यक्ष अनिल सावंत, शशिकांत जाधव, क्रांती थिएटर्सचे अमर गायकवाड, चंद्रकांत जावळे, अॅड. प्रतापसिंह देशमुख, प्रतापराव पवार,लक्ष्मीकांत रांजणे, शिवाजीराव जगताप, शाहीर सोनावणे, मनोहर पटवर्धन,धोंडीराम जावळे, दिनेश गाडे, मच्छिंद्र जाधव, नृत्यांगना रेश्मा परितेकर आदींनी यमुनाबाईंना श्रध्दांजली अर्पण केली.
अंत्ययात्रेत दिलीप पिसाळ, कांतीलाल पवार, प्रमोद शिंदे, विजय नायकवडी, बापूसाहेब शिंदे, अॅड. श्रीकांत चव्हाण, अॅड. उदयसिंह पिसाळ,चरण गायकवाड, राजेश गुरव, प्रदीप जायगुडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, निशिकांत डावळकर, विजय यादव, नृत्यांगना अनिता बारामतीकर,मोनिका जळगावकर, रेखा सातूरकर, सविता कनगरकर, जॉन फणसे, मदन भोसले, प्रदीप चोरगे वाई, इचलकरंजी, जेजुरी, तळेगाव दाभाडे, लोणावळा,वडगाव मावळ आदी शहरांतून यमुनाबाईंचे चाहते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
लोककलांचे अभ्यासक मधुकर नेराळे म्हणाले, विविधांगी लावणी सादर करणार्या शेवटच्या कलावतीचा यमुनाबाईंच्या निधनाने अस्त झाला.अशी लावणी यापुढे कोणीही ऐकवू, दाखवू शकेल असे वाटत नाही.यमुनाबाईंनी महाराष्ट्राच्या जुन्या पारंपरिक लावणी या लोककलेचे सूर, मांडणी,अदा आणि सौंदर्य अशा विविध अंगांनी देखणेपण सादर केले. भटक्या विमुक्त कोल्हाटी - डोंबारी समाजाच्या जीवनात स्थैर्य यावे, यासाठी त्यांनी वाई, जेजुरी,सातारा आदी ठिकाणी त्यांच्या वसाहती वसविल्या.
आ. मकरंद पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की लोकसंगीताचे प्रचंड भांडार यमुनाबाईंकडे होते. लावणी, तमाशा या लोककलांना त्यांनी सातासमुद्रापार नेले. त्यांच्या लावणीला सामान्य रसिकांपासून राष्ट्रपतींपर्यंत मानमान्यता लाभली. संगीत-नाटक अकादमी,पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित या कलावतीचं जाणं सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्राची फार मोठी हानी आहे. ज्या काळात जातपंचायतीत स्त्रीला कुठलंच स्थान नव्हतं त्या काळात जातपंचायतीचे प्रमुखपद त्यांनी भूषविले.कोल्हाटी-डोंबारी समाजातील अनिष्ट रुढी, प्रथांचे निर्मूलन व्हावे यासाठी तळमळीने काम केले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, लावणीसम्राज्ञी यमुनाबाई यांच्या जाण्याचे दुःख खूप मोठे आहे. आपल्या वैशिष्टयपूर्ण लावणी गायनाने त्यांनी महाराष्ट्राचे लोककला वैभव सतत वाढते ठेवले. सलग 60 वर्षे संगीतबारीच्या माध्यमांतून त्यांनी कलेची व रसिकांची सेवा केली. गायकीबरोबर शास्त्रीय संंगीताची त्यांना उत्तम जाण होती. पुण्यात झालेल्या कथ्थक महोत्सवातील बिरजू महाराज यांचे कथ्थक आणि यमुनाबाईंची लावणी अशी जुगलबंदी आजही अनेक रसिकांच्या स्मरणात आहे. तमाशा, लावणी या क्षेत्राला जेव्हा प्रतिष्ठा नव्हती, त्याही काळात यमुनाबाईंचे नाव आदराने घेतले जात होते. असे अलौकिक व्यक्तिमत्व आम्ही गमावले आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, रोटरीचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय घोरपडे, अर्बन बँकचे चेअरमन सीए सी. व्ही. काळे, पोपटलाल ओसवाल, शामराव देव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, अॅड.अरविंद चव्हाण, नगरसेवक महेंद्र धनवे, सतीश वैराट, विजय ढेकाने, अजित वनारसे, सुधीर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन एडगे, सहाय्यक फौजदार त्रिंबक अहिरेकर आदींनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |